सावंतवाडी : रासायनिक शेतीमुळे घरच मेडिकल स्टोअर्स बनले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅरगॅनिक फेडरेशनची स्थापना करून सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याचे ठरवून शेतकऱ्यांत जागृती करावी. तसेच आरोग्यदायी शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब परूळेकर यांनी केले. तळवडे येथे विभागीय शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी तळवडे, होडावडा, निरवडे, वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक झिपा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर, सचिव रामानंद शिरोडकर, कोषाध्यक्ष रणजित सावंत, संचालक प्रगतशील शेतकरी सचिन दळवी, सुरेश परब, माजी जिल्हा परिषद प्रकाश परब, आत्माचे जिल्हा सदस्य रमाकांत मल्हार, आजगाव सोसायटी चेअरमन एकनाथ नारोजी, माजी सभापती रमेश गावकर, नवसो परब, अभिमन्यू लोंढे उपस्थित होते.सिंधुदुर्गात सेंद्रिय हरितक्रांतीची चळवळ निर्माण करण्यासाठी असे शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. आपण घराच्या परसबागेतही सेंद्रिय भाजीपाला निर्माण करू शकतो. सेंद्रिय शेतीत गाय, निसर्ग हा महत्त्वाचा घटक आहे, असे परूळेकर यांनी सांगितले. प्रकाश परब यांनी कृषिक्रांती घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी कृषी व पर्यटन विकासाला सर्वांनी साथ द्यावी, असे सांगितले. संस्था सचिव रामानंद शिरोडकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. तळवडेचे ज्येष्ठ नागरिक झिपा सावंत यांनी रानमोडी, लाजरीचा बागायतींना होणारा त्रास सांगितला. रासायनिक खतांनी शेतीचे तोटे सांगितले. रमाकांत मल्हार यांनी आरोग्यदायी शेतीबाबत विवेचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर यांनी सूर्य उपासना, मंत्रोपासना करून शेतीतील यश कसे संपादन करता येते, साप, बेडूक, सरडे, आदी प्राण्यांचेही प्रमाण कमी होत असल्याने शेतीला फटका बसत असल्याचे सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष रणजित सावंत यांनी सूत्रसंचालन, सखाराम पेडणेकर यांनी मांडणी केली. यावेळी दत्ता खोत, सुनील धुरी, आनंद रावते, सुमित भोसले, आदींचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
आरोग्यदायी शेतीवर भर द्यावा
By admin | Published: March 27, 2015 10:15 PM