पालकमंत्री : लोकसहभागातून लातूरला वैरणअमरावती : जिकडे तिकडे पाणी टंचाईची स्थिती असून पाण्याअभावी जनजीवन विस्कळीत होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे जनतेने शासनाची वाट न पाहता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.माहुली जहांगीर येथे शनिवारी लोकसहभागातून लातूर या दुष्काळ विभागात जणावरांना चारा पाठविणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविताना ते बोलत होते. माहुली जहांगीर येथे स्व.हिराबाई गुल्हाणे चॅरिटेबल ट्रस्ट, प्रवासी वाहतूक संघटना यांनी ८ टन चारा लातुर जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाठविण्यात आला. तसेच साईकृपा पेस्ट कंट्रोल अँड ट्रेडर्स अमरावती, महालक्ष्मी बहुउद्देशीय स्वयंरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था, महालक्ष्मी डेअरी अॅन्ड गोट फार्म माहुली जहागीर यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देणगी दिली.पालकमंत्री म्हणाले की, जनतेनी जल साक्षर होणे आवश्यक असून नेहमी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. आज मराठवाड्यात पाण्याअभावी जनजीवन विस्कळित झाले आहे. म्हणून पावसाळ्यापूर्वी लोकांनी आपल्या शेतात विहिरी पुनर्भरण, घरात शोषखड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग व मिळेल त्या मागार्ने पावसाचे पाणी जमिनीत मुरवा म्हणजे निसर्गचक्र सुरळीत राहील. (प्रतिनिधी)
पर्यटन आराखड्यासाठी केंद्रात पाठपुरावा
By admin | Published: May 08, 2016 12:14 AM