शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
3
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
4
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
5
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
6
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेती जे. पी. नड्डा यांची भेट
7
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
8
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
9
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
10
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
11
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
12
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
13
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
14
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
15
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
16
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
17
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
18
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
19
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
20
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलामध्ये प्रथमच आठ वाघांची झाली नोंद, निसर्गप्रेमींना सुखद धक्का 

By अनंत खं.जाधव | Published: October 11, 2024 12:24 PM

सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत वाघाचे अस्तित्व

अनंत जाधवसावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र शासनाने सह्याद्री कोकण कॉरिडॉरची घोषणा केल्यानंतर आता वन्य प्राण्यांनाही सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जंगल परिसर सुरक्षित वाटू लागला आहे. सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आठ वाघांची नोंद झाली आहे. यात तीन नर आणि पाच मादींचा समावेश आहे. जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत हे वाघ दिसून आले आहेत.

सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून जनावरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढू लागले होते. त्यामुळे हे हल्ले वाघाकडूनच होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. तसेच काही ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना दिसले.जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली. यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. २०१४ च्या जनगणनेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्यावर आली होती. मात्र, आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

गोवा, कर्नाटक, राधानगरी अभयारण्यापर्यंत प्रवासदोडामार्ग तालुक्याला लागूनच कर्नाटक तसेच गोव्याचे जंगल आहे. मात्र, वाघांना सिंधुदुर्गचे जंगल अधिक सुरक्षित वाटत असल्याने अनेकवेळा हे वाघ कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहेत. वनअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे वाघ जरी सिंधुदुर्गमधील कॅमेऱ्यांत ट्रॅप झाले असले, तरी गोवा, कर्नाटक तसेच राधानगरी अभयारण्यापर्यंत यांचा प्रवास सुरूच असतो.

वाघांची संख्या वाढल्याने आता त्यांचा सुरक्षित अधिवास टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. दिवस-रात्र जंगलात पेट्रोलिंग तसेच कॅमेऱ्यातून नजर ठेवणे, सीमा परिसरात नजर ठेवणे आदी कामे हाती घेतले आहेत. - नवकिशोर रेड्डी, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTigerवाघforest departmentवनविभाग