सावंतवाडी : संकेश्वर बांदा महामार्गचा आराखडा पूर्ण होऊन आंबोली पर्यंतच्या मार्गाला निधी ही केंद्रिय रस्ते महामार्ग विभागाने मंजुर केला असतनाच दुसरीकडे मात्र वनविभागाकडून देवसू पासून आंबोली घाट मार्गावर संरक्षक कठडे उभारण्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे संरक्षक कठडे कोणाच्या तरी नजरेत येऊ नयेत म्हणून रस्त्या पासून आत मध्ये दोनशे मीटर घेतले असून हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या सर्व प्रकारावर वनविभागाचे अधिकारी सारवा सारव करीत असून अद्याप महामार्गा बाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत.
केंद्र सरकारकडून संकेश्वर बांदा हा नवा महामार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आराखडा ही तयार करण्यात आला असून बांधकाम विभागाकडून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग ही करण्यात आला आहे या महामार्गाचा जो आराखडा निश्चित करण्यात आला आहे या आराखड्या प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, माडखोल, सावंतवाडी, इन्सुली, बांदा मार्गावरून हा रस्ता निश्चित करण्यात आले आहे.
मात्र हा मार्ग निश्चित झाला असतानाच दुसरीकडे मात्र वनविभागाकडून आंबोली घाट मार्गावर रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे उभारणाऱ्याचे निश्चित करण्यात आले असून यासाठी नियोजन विभागाकडून निधी ही मजूर करण्यात आला आहे.मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत हा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.तसेच काहि संरक्षक कठडे ही गेल्या वर्षी उभारण्यात आले असून त्यानंतर तक्रारी झाल्यानंतर या कठड्याचे काम थांबविण्यात आले होते.मात्र या वर्षी पुन्हा काम सुरू करण्यात आले असून कामाबाबत तक्रारी होऊ नये तसेच आलेला निधी खर्च व्हावा म्हणून वनविभागाकडून नामीशक्कल लढविण्यात आली असून हे कठडे मुख्य मार्गा पासून तब्बल दोनशे मीटर आत मध्ये रस्त्यावरून कुणाला दिसणार नाहीत अशा ठिकाणी उभारण्यात आले आहेत त्यामुळे वन विभागाला नेमके हे कपडे कशासाठी हवे होते असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
तसेच हे संरक्षक कठडे उभारताना संबंधित ठेकेदाराने वरच्यावर उभारल्याने हे कठडे भर पावसात केव्हाही कोसळू शकतात त्यामुळे हे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता वन विभागाचे अधिकारी कानावर हात घेत आहेत तर आंबोलीतील काही ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रारी केल्या आहेत.महामार्ग होत असेल संरक्षक कठडे कशासाठीसंकेश्वर बांदा हा महामार्ग आंबोली घाटातून जात असेल तर नियोजन विभागाचा पैसा खर्च करून हे संरक्षक कठडे कशासाठी उभारण्यात येत आहेत की पैशाची ही उधळपट्टी सुरू आहे एक तर करू ना काळात कोणत्याही विकासकामांना निधी मिळत नसताना असे पैसे खर्च करून शासन कशासाठी खर्च करत आहे असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.