शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

Corona vaccine Sindhudurg- कोविड लसीकरणात पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 10:45 AM

Corona vaccine Sindhudurg- कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४५० पोलिसपाटलांची कोविड १९ च्या लसीकरणासाठी अद्याप ऑनलाईन नोंदणीच करण्यात आलेली नाही . त्यामुळे पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर पडला की काय ? असा सवाल पोलिसपाटलांकडून केला जात आहे . तर प्रशासनाच्या या कारभाराबाबत संघटनेकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकोविड लसीकरणात पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर लसीकरणासाठी नोंदणी नाही; संघटनेकडून नाराजी व्यक्त

कणकवली : कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४५० पोलिसपाटलांची कोविड १९ च्या लसीकरणासाठी अद्याप ऑनलाईन नोंदणीच करण्यात आलेली नाही . त्यामुळे पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर पडला की काय ? असा सवाल पोलिसपाटलांकडून केला जात आहे . तर प्रशासनाच्या या कारभाराबाबत संघटनेकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.खेड्यापाड्यात लॉकडाऊनकाळात कसलीही सुरक्षेची साधने नसताना कोरोना बाधित रूग्णांना सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन करणे , पुणे , मुंबईहून आलेल्या लोकांची तपासणी करून घेणे , त्यांचे विलगीकरण करून घेणे , संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे , त्याची माहिती महसूल , पोलिस आणि आरोग्य प्रशासनास रोजच्या रोज देणे अशी कामे पोलिसपाटलांनी केली .काही गावात कोरोनाचा प्रवेश होवू न देण्यातही पोलीस पाटलांचा मोठा वाटा होता. अजूनही पोलिसपाटील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत . असे असताना कोविड लसीकरणात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . अंगणवाडी कर्मचारी , आशा वर्कर्स , शिक्षक , पोलिस यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

परंतु प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पोलिस पाटलांचा मात्र प्रशासनाला विसर पडल्याची भावना पोलिसपाटलांमध्ये निर्माण झाली आहे . दरम्यान , याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे सचिव अनंत राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाचे लसीकरणाबाबत लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्ग