शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

प्रारूप ग्रा.पं. विकास आराखडा मंजूर

By admin | Published: July 18, 2016 8:51 PM

कासार्डे आरोग्यकेंद्रात ग्रामसभा : ‘आमचा गाव, आमचा विकास’ कार्यक्रम उत्साहात

प्रारूप ग्रा.पं. विकास आराखडा मंजूर -कासार्डे आरोग्यकेंद्रात ग्रामसभा : ‘आमचा गाव, आमचा विकास’ कार्यक्रम उत्साहातनांदगाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत कासार्डे ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक व वार्षिक विकास आराखडा कार्यक्रम पार पडला. यावेळी कासार्डे प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रारूप ग्रामपंचायत विकास आराखड्याला मंजुरी घेत ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली.यावेळी गेले चार दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात ग्रामसंसाधन गटाची स्थापना करून लोकांचा सहभाग आवश्यक असल्याने प्रथम ग्रामसंसाधन गट स्थापन केला. यानंतर ‘आमचा गाव, आमचा विकास’ कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाची वातावरण निर्मिती आणि सर्वांपर्यंत नियोजन प्रक्रियेची माहिती पोहोचण्यासाठी कासार्डे पेट्रोलपंप ते आरोग्यकेंद्र सभागृहापर्यंत मशालफेरी काढून जनजागृती केली. यानंतर अंगणवाडी, शाळा व आरोग्य उपकेंद्र यांना भेट देऊन समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत प्रभातफेरी, बलस्थाने, कमकुवत घटक, धोके, संधी यांचे विश्लेषण सामाजिक नकाशा, जनगणना माहिती, ग्रामपंचायत निधी उपलब्धता, गावस्तरावरील समित्या, विविध घटक, शेतकरी, उद्योजक, मागासवर्गीय समस्या, जल, जंगल, जमीन पाहण्यासाठी शिवार फेरी व पायाभूत सुविधा पाहणी करून पेयजल, स्वच्छता व पायाभूत सुविधा, किशोरवयीन मुली व महिला बैठक, माझ्या स्वप्नातील गाव चर्चासत्र व प्राधान्यक्रम, महिला सभा यानुसार आराखड्याचा मसुदा तयार करण्यासाठी ग्रामसंसाधन गटाने प्रत्यक्ष भेट देत माहिती घेतली. यासाठी शासनातर्फे यशदा पुणे संस्थेतर्फे प्रशिक्षक हर्षदा वाळके, आर. के. पेंढारकर यांनी चार दिवस प्रशिक्षण दिले.१४ व्या वित्त आयोगांतर्गत प्रामुख्याने अपारंपरिक ऊर्जास्रोत, महिला सक्षमीकरण, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायत सबलीकरण यांसह पाच बाबींवर कोट्यवधींचा निधी हा ग्रामपंचायतीतर्फे खर्च करण्यात येणार आहे. केंद्राची ही योजना असून, सन २०१६-१७ ते २०१९-२० या पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून यानुसार ग्रामपंचायतीला निधी देताना लोकसंख्येच्या ९० टक्के व क्षेत्रफळाच्या १० टक्के निधी देण्यात येणार आहे. हा निधी ग्रामपंचायतीला थेट देण्यात येणार आहे. निधी खर्च करताना महिला, बालकल्याण, अनुसूचित जाती, आरोग्य, शिक्षण, उपजीविका यावर खर्च करण्यात येणार आहे, असे वाळके यांनी सांगितले. यावेळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी या कार्यक्रमांतर्गत कासार्डे गावातील महसुली गावामधून आलेल्या कामाची माहिती व विकासात्मक काम समाविष्ट करण्यासाठी आलेल्या कामाची यादी वाचून दाखविली. यातून २५ टक्के शिक्षण, आरोग्य, पोषण, १० टक्के महिला बालकल्याण, १५ टक्के मागासवर्गीय खर्च, ३ टक्के अपंग व उर्वरित असा मिळणारा सन २०१६-१७ साठी २३ लाख ६६ हजार ५०, सन २०१७-१८ साठी ३१ लाख ६२ हजार ४६८, २०१७ व सन २०१८-१९ साठी ४२ लाख ७३ हजार १६६, सन २०१९-२० साठी ४२ लाख ७३ हजार १६६ असा पंचवार्षिक एकूण १ कोटी २५ लाख ३७ हजार ४४५ एवढा निधी ग्रामपंचायतीला मिळणार असल्याची माहिती दिली. मिळणाऱ्या प्राप्त निधीबाबत ग्रामस्थांनी सखोल माहिती घेतली.यानंतर प्रारूप पंचवार्षिक बृहत विकास आराखडा आणि वार्षिक विकास व कृती आराखड्यास ग्रामसभेने मान्यता दिली. शासनातर्फे यशदा पुणे संस्थेतर्फे प्रशिक्षक हर्षदा वाळके, आर. के. पेंढारकर, सरपंच संतोष पारकर, उपसरपंच रिया जाधव, कासार्डे ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, पंचायत समिती सदस्य संजय देसाई, डॉ. पी. एम. इंगवले, माजी सरपंच बाळाराम तानवडे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय शेट्ये, संजय पाताडे, हरिश्चंद्र बंड, संजय नकाशे, प्रकाश पारकर, बाळा कोलते, दीपक सावंत, सत्यवान आयरे, नीलेश जमदाडे, शारदा आंबेरकर, राजकुमार पाताडे, सहदेव म्हस्के, डॉ. अरविंद कुडतरकर, अतुल सावंत, गावातील विविध मंडळांचे पदाधिकारी, अंगणवाडी, आशा सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)कामे जास्त निधी अपुरापूर्वी ग्रामपंचायतस्तरावर विकासात्मक कामे मंजूर केली जायची. मात्र, १४ व्या वित्त आयोगात पंचवार्षिक व वार्षिक विकास आराखडा कार्यक्रमात विविध कामे सुचविण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी सुचविलेल्या कामाच्या मोठमोठ्या याद्या देण्यात आल्या. यामुळे मिळणारा निधी हा गावच्या विकासासाठी अपुरा असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत होती.