सावंतवाडी : शिवसेनेत प्रवेश दिला जावा म्हणून मंत्री दीपक केसरकर हे माझ्याकडे आले होते. अनेकजण येतात तसे केसरकर ही आले होते. म्हणून मी त्यांना मातोश्री वर घेऊन गेलो पण आज मला केसरकर यांना मातोश्रीवर घेऊन गेलो यांचा पश्चाताप होत आहे. दहशतवादाची लढाई लढायला शिवसेनेत आले आणि आत त्याच्याच मांडीवर जाऊन बसले अशी जोरदार टिका माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.ते सावंतवाडीतील आदी नारायण मंगल कार्यालयात रविवारी उद्धव ठाकरे गटाकडून शिवगर्जना सभेत ते बोलत होते. यावेळी लोकसभा सर्पक प्रमुख प्रदीप बोरकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, चंद्रकांत कासार, रूपेश राऊळ, बाळा गावडे आदी उपस्थित होते.देसाई म्हणाले, १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करत होतो. आज जरी बाळासाहेब नसले तरी त्याच ताकतीने पक्ष वाढण्यासाठी काम करत आहे. जरी चिन्ह आणि पक्षाचे नाव विरोधकांनी चोरले असले तरी ही संपत्ती पुन्हा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी अहोरात्र झटणार आहे. नंतर माझे डोळे मिटले तरी चालतील अशी भावनिक साद देसाई यांनी उपस्थित सैनिकांना घालत सैनिक हीच उद्धव ठाकरे यांची ताकद आहे त्यामुळे सर्वानी एकदिलाने काम करा असे आवाहनही केले.भविष्यात ते भाजपमध्ये असतील देसाई यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. केसरकर हे मला मातोश्रीवर घेऊन चला मला शिवसेनेत यायचे आहे म्हणून गोरेगाव येथील माझ्या घरी आले होते. अनेकजण येतात तसे केसरकर हे आले होते. मी त्यांना मातोश्रीवर नेऊन प्रवेश दिला पण आज त्याचा मला पश्चाताप होत आहे. हे जरी शिंदे सोबत गेले असले तरी भविष्यात ते भाजप मध्ये असतील अशी टिका देसाई यांनी केली. शिंदे गटात गेल्यानंतर केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन किती बैठका घेतल्या असा सवाल करत यांच्यामागे कोण नाहीतर बैठका तरी कशा घेणार अशी टीकाही केली. राणेंच्यांच मांडीवर जाऊन बसले शिवसेनेत आले तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणेचा दहशतवाद संपवणार अशा वल्गना केल्या. म्हणे राणे शिवसेनेत आले तर आम्ही एकक्षण थांबणार नाही सांगायचे. मग आज तर राणेच्याच मांडीवर जाऊन बसले उद्या निवडणुकीत त्याचा प्रचारही करतील अशी टिका माजी मंत्री सुभाष देसाई यांनी केली.यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, जान्हवी सावंत, संजय पडते आदीनी आपले विचार मांडले. या शिवगर्जना मेळाव्याला सावंतवाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आले होते. मेळाव्याचे प्रस्ताविक रूपेश राऊळ यांनी केले.
केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेल्याचा पश्चाताप, सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:38 AM