सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी ८० उमेदवार रिंंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी शेवटच्यादिवशी ८६ जणांनी माघार घेतली. या निवडणुकीत शिक्षक संघाचे शि. द. पाटील गट, संभाजीराव थोरात गट, शिक्षक समिती व परिवर्तन पॅनेल अशी चौरंगी लढत होत असून, गुरुवारी चिन्ह वाटप होणार आहे. शिक्षक बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक लागल्यापासूनच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. बँकेच्या सत्तेसाठी शिक्षक संघातील दोन गट व शिक्षक समितीने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी १६६ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. दिवसभरात सर्वच पॅनेलचे प्रमुख इच्छुकांची मनधरणी करून अर्ज माघारीसाठी प्रयत्नशील होते. शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील व त्यांचे प्रमुख पदाधिकारी शिक्षक भवनातून सूत्रे हलवित होते. संघाकडून पाचजणांनी माघार घेतली. समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा नेते किसनराव पाटील, बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत आदी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठाण मांडून होते. समितीच्या इच्छुकांना अर्ज माघारीचे साकडे घातले गेले. त्याला समितीच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला. संभाजीराव थोरात गटाकडून जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, विजयकुमार चव्हाण, जगन्नाथ कोळपे, शशिकांत माणगावे, हंबीरराव पवार आदींनी इच्छुकांची मनधरणी केली. चारही पॅनेलचे प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी केली होती. अर्ज माघारीच्या मुदतीत ८६ जणांनी माघार घेतली. शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात, विश्वनाथ मिरजकर यांच्या समितीने प्रत्येकी २१ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत, तर परिवर्तन पॅनेलला केवळ १७ जागांवरच उमेदवार उभे करता आले. सर्वसाधारण गटातील वाळवा, आटपाडी, कडेगाव व नागरिकांचा इतर मागासप्रवर्ग या चार जागांवर परिवर्तनला उमेदवार मिळू शकले नाहीत. शि. द. पाटील गटाकडून विद्यमान संचालक उत्तम पाटील, जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, पलूस तालुकाध्यक्ष सुनील गुरव, अमोल माने, सुरेखा पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली असून, तरुण कार्यकर्त्यांवर भर दिला आहे. थोरात गटातून चार विद्यमान संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. त्यात जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, अविनाश गुरव, सतीश पाटील, बाळासाहेब अनुसे यांचा समावेश आहे. जुन्या, नव्यांचा मेळ घालण्यात थोरात गटाला यश आले आहे. शिक्षक समितीने यंदा संपूर्ण नवे पॅनेल मैदानात उतरविले आहे. माजी संचालक व जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील व इतर मागासवर्गातून श्रीकांत माळी या दोन माजी संचालकांचा पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर उमेदवारांत नवख्या व समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी संधी दिली आहे. गुरुवारी पॅनेलसाठी चिन्हांचे वाटप होणार असून, सर्वच पॅनेलनी एकच चिन्हाची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)असे आहेत चार पॅनेलचे उमेदवारशिक्षक समिती पॅनेल (मिरजकर गट)सर्वसाधारण : सयाजीराव पाटील, रमेश पाटील, तुकाराम गायकवाड, महादेव पाटील, श्रेणिक चौगुले, शिवाजी पवार, शब्बीर तांबोळी, धोंडीराम पिसे, राजाराम शिंदे, बाळासाहेब आडके, महादेव माळी, शशिकांत बजबळे, मल्लिकार्जुन बालगाव, राजाराम सावंत, सदाशिव पाटील, उत्तम जाधव. अनु. जाती : देवानंद घोटखिंडी, महिला राखीव : सुषमा देशमाने, अर्चना खटावकर. इतर मागास : श्रीकांत माळी. वि.जा.भ. जाती : हरिबा गावडे.स्वाभिमानी मंडळ पॅनेल (थोरात गट)सर्वसाधारण : विनायक शिंदे, सुधाकर पाटील, संजय काटे, शिवानंद तेलसंग, शामगोंडा पाटील, आसिफ शेख, अविनाश गुरव, रघुनाथ थोरात, सतीश पाटील, सुनील गुरव, बाजीराव पाटील, सुरेश पाटील, प्रकाश जाधव, धनंजय नरुले, विलास हाके, अशोक मोटे. एनटी : बाळासाहेब अनुसे. एससी : महादेव हेगडे. ओबीसी : फत्तू नदाफ . महिला राखीव : वैशाली पाटील, शोभा पाटील.शि. द. पाटील गट सर्वसाधारण : उत्तम पाटील, राहुल पाटणे, सुरेश पवार, ब्रिजेश पाटील, जयश्री मोहिते, श्रीकांत पवार, महेश सावंत, अमोल माने, संतोष जगताप, प्रभाकर भोसले, मधुकर जंगम, अजित पाटील, दयानंद मोरे, सुरेश शिळीन, संजय पाटील, जगन्नाथ जाधव. अनु.जाती : मुकुंदराव सूर्यवंशी. महिला राखीव : सुरेखा पाटील, शारदा सलगर. ओबीसी : सुनील गुरव. एनटी : दीपक कोळी.परिवर्तन पॅनेलसर्वसाधारण : सुवर्णा पाटील, जयश्री पाटील, मालूताई पाटील, अनिल मोहिते, शंकर साळुंखे, सुधीर भाट, शिवाजी माळी, अशोक कोळेकर, माणिक सकटे, मल्लेशाप्पा कांबळे, बसाप्पा पुजारी, यासराव शेळके, वसंत शेटके, एनटी : संभाजी मोहिते, एससी : संतोष कदम, महिला राखीव : विद्यादेवी नलवडे, लाडूताई सुतार.
प्राथमिक शिक्षक बँकेसाठी चौरंगी लढत
By admin | Published: April 15, 2015 11:22 PM