शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

दोडामार्गमध्ये ‘स्वाइन’चा चौथा रुग्ण

By admin | Published: May 10, 2017 11:45 PM

दोडामार्गमध्ये ‘स्वाइन’चा चौथा रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कदोडामार्ग : माकडतापापाठोपाठ स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. तालुक्यात स्वाइन फ्लू बाधित चौथा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. गितांजली गोविंद सावंत (वय ५७, रा. झरेबांबर) असे रुग्णाचे नाव असून, त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली. गेल्या वर्षभरात माकडतापाने दोडामार्ग आणि बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच काहीजणांचे बळीही गेले. त्यामुळे दोडामार्ग व बांदा परिसरातील लोक माकडतापाच्या दहशतीखाली आहेत. असे असताना महिनाभरापूर्वी तालुक्यात सोनावल येथे रंजना अशोक चोर्लेकर (४२), घोडगेवाडी येथे प्रथमेश प्रभाकर सातार्डेकर (१०) व साटेली-भेडशी येथील विराज गवस असे तीन रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून स्वाईन फ्लूवरील औषधे उपलब्ध असल्याने ताप आल्यास सरकारी दवाखान्यात येऊन तपासून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले होते. अशातच झरेबांबर येथील गितांजली गोविंद सावंत यांना ताप येत असल्याने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार करून त्यांची तब्येत सुधारल्यावर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.