शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

वेंगुर्लेत सत्तेसाठीच मोर्चेबांधणी

By admin | Published: October 13, 2016 9:33 PM

सेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी तयारीत : युती, उमेदवारांसाठी चाचपणी; सभापतींसह तीन विद्यमानांना संधी!

प्रथमेश गुरव -- वेंगुर्लेतील नव्या आरक्षणाने बहुतांशी उमेदवारांची अडचण झाली आहे. सभापतींसह तीन विद्यमानांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या तीन वर्षांत राष्ट्रवादीने सत्ता गाजविली, तर शेवटच्या दोन वर्षांत शिवसेनेने अनपेक्षितपणे पंचायत समितीवर सत्ता मिळविली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना, गेलेली सत्ता परत मिळविण्यासाठी काँगे्रस, तर नव्या जोमाने जिल्ह्यात विस्तारित झालेला भाजप आणि जिल्ह्यात संजीवनीची गरज असणाऱ्या गत विजेत्या राष्ट्रवादीत लढत रंगणार आहे. आगामी युती आणि उमेदवारांच्या शोधासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाल्याचे चित्र वेंगुर्ले पंचायत समितीत पाहावयास मिळत आहे.वेंगुर्ले पंचायत समितीचे १० मतदारसंघ असून, मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेसचे ३ व अपक्ष १ अशी संख्या होती. राष्ट्रवादीचे अभिषेक चमणकर यांची सभापतिपदी वर्णी लागली होती. चमणकर यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेना पुरस्कृत सुचिता वजराठकर यांची सभापतिपदी वर्णी लागली व पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाली. सध्या पडलेल्या पंचायत समितीच्या आरक्षणानुसार पूर्वीचा आरवली मतदारसंघ आता शिरोडा मतदारसंघ झाला आहे, तर उर्वरित मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच आहेत. शिरोडा पंचायत समिती मतदारसंघ खुला झाल्याने विद्यमान सदस्या उमा मठकर यांच्यासह रेडी पंचायत समिती मतदारसंघ खुला झाल्याने विद्यमान सदस्य चित्रा कनयाळकर यांना संधी आहे. मात्र, रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ हाही खुला असल्याने येथील काँग्रेसच्या विद्यमान सदस्या निकिता परब यांनी उमेदवारी न मागितल्यास या मतदारसंघातील जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून चित्रा कनयाळकर यांचे नाव चर्चेत आहे. उभादांडा पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्य व माजी सभापती अभिषेक चमणकर यांची संधी हुकली आहे. याठिकाणी काँग्रेसतर्फे परबवाडा सरपंच इनासिन फर्नांडिस, राष्ट्रवादीच्या सरोज परब यांची नावे चर्चेत आहेत. उभादांडा जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी खुला झाल्याने अभिषेक चमणकर यांना जिल्हा परिषदेसाठी संधी चालून आली आहे, तर शिवसेनेतर्फे रमेश नार्वेकर व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, काँग्रेसतर्फे माजी सभापती सारिका काळसेकर, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नीलेश चमणकर यांची नावे चर्चेत आहेत. परुळे पंचायत समिती मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असल्याने विद्यमान सदस्या प्रणाली बंगे यांना संधी आहे.तुळस पंचायत समिती मतदारसंघ खुला असल्याने विद्यमान सभापती सुचिता वजराठकर यांना संधी आहे. शिवसेनेतर्फे बाळू परब, मकरंद परब, तर काँग्रेसतर्फे मनीष दळवी, विजय रेडकर यांची नावे चर्चेत आहेत. तुळस जिल्हा परिषद मतदारसंघ इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान सदस्या योगिता परब यांचा पत्ता कट झाला आहे. म्हापण पंचायत समिती मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असल्याने विद्यमान सदस्य पुरुषोत्तम परब यांची संधी हुकली आहे. म्हापण जिल्हा परिषद मतदारसंंघ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून, विद्यमान सदस्या वंदना किनळेकर यांना पुन्हा संधी आली आहे. आडेली पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी असल्याने विद्यमान उपसभापती स्वप्निल चमणकर यांचा तसेच आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी असल्याने विद्यमान सदस्य समीर नाईक यांचाही पत्ता कट झाला आहे. वायंगणी पं. स. मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी असल्याने विद्यमान सदस्य समाधान बांदवलकर यांचा पत्ता कट झाला आहे. मातोंड पंचायत समिती मतदारसंघ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग असल्याने विद्यमान सदस्य सावरी गावडे यांची संधी हुकली आहे. काँग्रेसकडून सोमा मेस्त्री, ज्ञानेश्वर केळजी, शिवसेनेकडून शामसुंदर पेडणेकर यांची नावे चर्चेत आहेत. आसोली पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण असल्याने विद्यमान सदस्य तथा माजी उपसभापती सुनील मोरजकर यांना संधी चालून आली आहे.पदाधिकाऱ्यांची धावपळ आणि राजकीय आडाखेदरम्यान, बदललेल्या आरक्षणाने सर्वच पक्षांचा गोंधळ उडाला असून, तालुका पदाधिकारी आपल्या पक्षांचा उमेदवार शोधण्यासासाठी सक्रिय झाला आहे. तसेच आगामी युतीसाठीही हे पदाधिकारी प्रभागनिहाय आडाखे बांधत असून, वरिष्ठांपेक्षा जनतेला रूजणारी युती करण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. राष्ट्रवादीला संजीवनीची संधीदरम्यान, जिल्ह्यात बॅकफूटवर गेलेली राष्ट्रवादी वेंगुर्लेत मात्र अजूनही आपला झेंडा ताठ मानेने घेऊन उभी आहे. गत निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत जर राष्ट्रवादीने सत्ता मिळविली तर पक्षाला जिल्ह्यात संजीवनी मिळणार आहे.