शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

कणकवली मतदारसंघासाठी २ हजार २१० कोटीचा निधी, आमदार नीतेश राणेंनी दिली माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 11, 2023 2:36 PM

ठाकरे सेनेकडील सरपंच आमच्याकडे आले तर विकास निश्‍चित

कणकवली : कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघाच्या विकासासाठी राज्‍य शासनाने तब्‍बल २ हजार २१० कोटींचा निधी दिला आहे. त्‍यानुसार लवकरच टेंडर प्रक्रिया होऊन विकास कामे सुरू होतील. मतदार संघातील ज्या ग्रामपंचायत ठाकरे सेनेकडे आहेत त्‍यांच्याही सरपंचांनी विचार करावा. त्‍यांना आपल्‍या गावात विकास हवा असेल तर आमदार ज्‍या पक्षात असेल त्‍या पक्षात आलात तर विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत  दिली.आमदार राणे म्‍हणाले, सन २०२३ आणि २०२४ च्या बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम या हेडखाली या मतदारसंघासाठी २३८ कोटी आम्‍हाला मिळालेले आहेत. या २३८ कोटीच्या कामांची यादी प्रसार माध्यमांना देणार आहे. जेणेकरून आमच्या विरोधकांना कळेल की ही कामे आमच्या नेतृत्‍वामुळे मिळाली आहेत. आमच्या विरोधकांना नेहमीच दुसऱ्या मुलांचं बारसं करण्याची सवय. आम्‍ही कामं आणणार हे नारळ फोडणार आणि कामं आम्‍हीच केली असं सांगणार सन २०२३-२४ या वर्षासाठी २३८ रूपये प्राप्त झाले. तर २०२२-२३ मध्ये १५० कोटी रूपयांचा निधी आला. तर नाबार्ड अंतर्गत १० कोटी मिळाले आहेत. जिल्‍हा वार्षिक योजना अंतर्गत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या कणकवली मतदारसंघासाठी २५ कोटी मिळाले. डोंगरी विकास निधीमधून आम्‍ही सुचविलेल्‍या कामांसाठी ३५० कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तळेरे विजयदुर्ग रस्त्यासाठी २५० कोटी रूपये मिळाले आहेत. गगनबावडा तळेरे रस्ता मुख्य घाट रस्तासाठी त्‍याला २५० कोटी, देवगड निपाणी फोंडाघाट रस्त्यासाठी ८३९ कोटी मिळाले आहेत. पंतप्रधान गामडक योजना ४२ कोटी मिळाले.मुख्यमंत्री ग्रामसडक सयोजना १६ कोटी मिळाले. २५-१५ योजनेसाठी ५ कोटी मिळाले. अल्‍पसंख्यांक मतदार संसाठी १ कोटी, समाजकल्‍यासाठी १ कोटी पाटबंधारे विभागासाठी छोटे बंधारे यासाठी ३२५ कोटी माझ्या मतदारसंघासाठी मिळाले आहेत राणे म्‍हणाले, ही कामं लवकरच सुरू होतील. वर्क ऑर्डर निघतील पण कामाच्या दर्जाची जबाबदारी आमची असेल. नुसतं पैसे आणणं महत्‍वाचं नाही. तर कामाचा दर्जा त्‍याच पद्धतीने व्हायला हवा यावर आमचं लक्ष असेल. ही कामं आम्‍ही आणि आमच्या सरकारने आणलेली आहेत. मी सांगितल्‍यामुळे आहेत. म्‍हणूनच मी ग्रामपंचायत वेळी आवाहन केलं होतं. जे निधी आणत असतील त्‍यांच्यासोबतच राहावं.

देवगड नगरपंचायतमध्ये नाकारूनही निधी दिला राणे म्‍हणाले, देवगड नगरपंचायतमध्ये लोकांनी आम्‍हाला नाकारल. सध्या ठाकरे सेनेची सत्ता तेथे आहे. तरीही लोकांशी, जनतेशी आम्‍ही बांधील आहोत. तेथील जनतेवर अन्याय होता नये. तेथील नेतृत्‍व कमी पडले असले तरी आम्‍ही आमच्या नगरपंचायतीसाठी २ कोटी ७५ लाख रूपये आणले आहेत. तर नगरोत्थान साठी ४ कोटी ३५ लाख प्राप्त झाले आहेत. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीसाठी अडीच कोटी आणले आहेत. तर नगरोत्‍थानअंतर्गत १ कोटी ३० लाख निधी आला.

मतदारांनी विश्वास ठेवल्याबाबत आभारीराज्‍यात ठाकरे सरकार असताना मला त्‍या सरकारबरोबर संघर्ष करायला लागायचा. इथे उदध्व ठाकरे यांच्या विचारांचा पालकमंत्री असल्‍याने माझ्या मतदारसंघावर सातत्‍याने अन्याय होत रहायचा. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील मतदारांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला. त्‍यामुळेच राज्‍यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्‍यानंतर मी माझ्या मतदारसंघाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकलो आहे.

कणकवलीवासीयांवरील अन्याय दूर झालाकणकवली नगरपंचायत सातत्‍याने आमच्यावर अन्यायच व्हायचा. ठाकरे सरकार असताना तर अतीअन्याय झाला. पण आमचे सरकार आल्‍यानंतर नवीन धबधबा प्रकल्‍प मार्गी लागला. या कृत्रीम धबधब्‍याचे लवकरच भूमिपूजन होईल. स्पोर्ट कॉम्प्लेक्‍सचेही काम पूर्ण होत आहे. रिंगरोड देखील मार्गी लागतोय. तसेच इतर असंख्य विकास कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. नागरी सहाय्य योजना कणकवलीसाठी शासनाने साडे बारा कोटी रूपये दिले आहेत. तर जिल्‍हा वार्षिक पर्यटनसाठी १० कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवली