शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

निधीचा ठणठणाट!

By admin | Published: June 20, 2014 11:08 PM

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद : इमारती दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यात कोट्यवधीच्या शासकीय कार्यालयाच्या इमारती उभ्या राहिल्या. मात्र, आता या इमारतीच्या दुरूस्ती, ड्रेनेजच्या समस्या सोडविण्यासाठी निधीच मिळत नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा निर्मितीला २५ वर्षे होत आली. जिल्हा मुख्यालय निर्मितीसाठी मोठमोठ्या इमारती उभारण्यात आल्या. कर्मचारी वसाहती निर्माण झाल्या. मात्र, या इमारतीच्या दुरूस्तीसाठी आणि ड्रेनेजसारख्या गंभीर समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून निधीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या इमारती आणि कर्मचारी वसाहतीच्या ड्रेनेज दुरूस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय इमारतीची दुरूस्ती आणि ड्रेनेज दुरूस्तीची कामे करण्यासाठी लागणारी मंजुरी आणि जॉब नंबर देण्याचे अधिकार हे अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांच्याकडे आहेत. त्यामुळे कोणतेही दुरूस्तीचे काम करायचे झाल्यास अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांची मंजुरी घ्यावी लागते. त्यांच्या मंजुरीशिवाय किंवा जॉब नंबर मिळाल्याशिवाय कोणतीही कामे करता येत नाहीत. गेल्यावर्षीच्या दुरूस्ती कार्यक्रमाला त्यांच्याकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निधीही उपलब्ध नाही. यापूर्वी केलेल्या कामाचे पैसेही अद्याप मिळाले नसल्याने संबंधित ठेकेदार किरकोळ दुरूस्तीची किंवा तातडीची दुरूस्ती कामे करण्यास तयार होत नाहीत. आतापर्यंत उधारीवरच काही ठेकेदार कामे करीत असल्याचे उघड झाले आहे. ड्रेनेज दुरूस्तीसारखी कामे करण्याची दरसूची दर अल्प असून या दरात ही कामे करण्यास कोणीही तयार होत नाही. तसेच ड्रेनेज दुरूस्तीसारखी कामे करायला कोणी येथे कामगारही मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी वसाहती आणि शासकीय इमारतीच्या ड्रेनेज दुरूस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रेनेज दुरूस्तीसारख्या गंभीर समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये निधीची तरतूद होण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणारी कामे मंजुरीचे अधिकार अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याकडे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामांच्या यांच्याकडे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामांच्या समस्या वाढल्या आहेत. तातडीची कामे करण्यास अडचणी येत आहेत. तरी याबाबतचे अधिकार जिल्ह्याच्या कार्यकारी अभियंत्यांना मिळाले पाहिजेत. तरच जिल्ह्यातील ड्रेनेज दुरूस्तीसह विविध समस्या तातडीने सोडविता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)