ओरोस : पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकडील वैयक्तिक लाभाच्या पहिल्या याद्या मंजूर होऊन तालुका पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत. दुसरी यादी लवकरच पाठविली जाईल. तालुकास्तरावर काम करणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मार्च अखेरपूर्वी निधी खर्च करायचा आहे. त्यामुळे तशाप्रकारे नियोजन करून जलद काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धविकाससमिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी मासिक सभेत दिल्या.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी सभा सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, सदस्य अनुप्रिती खोचरे, मानसी धुरी, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय गोसावी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सभापती म्हापसेकर यांनी, दुधाळ जनावरे वाटप योजनेचे १२५ प्रस्ताव मंजूर करून तालुकास्तरावर पाठविलेले आहेत. दुसरी यादी आठ दिवसांत पाठविली जाईल. तसेच नव्याने १७ लाख रुपयांची मंजूर करण्यात आलेल्या परसबाग व तलंग वाटप या खास महिलांसाठीच्या योजनेची यादी लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित मुलांची यादी मागविण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच २५ पिल्लांची ही योजना राबविली जाईल.ॲस्केड योजनेअंतर्गत जिल्ह्यात पशुविषयी प्रशिक्षणे घेण्यासाठी २५ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु कोरोनामुळे ही प्रशिक्षणे घेता येणार नाहीत. त्यामुळे पशुविषयी माहिती देणारी पत्रके छापण्यासाठी व फलक लावण्यासाठी यावेळी मंजुरी देण्यात आली.
पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकडील निधी मार्चपूर्वी खर्च करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 4:13 PM
zp sindhudurgnews- कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मार्च अखेरपूर्वी निधी खर्च करायचा आहे. त्यामुळे तशाप्रकारे नियोजन करून जलद काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धविकाससमिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी मासिक सभेत दिल्या.
ठळक मुद्दे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकडील निधी मार्चपूर्वी खर्च करावा पशुसंवर्धन समिती सभेत सभापतींच्या सूचना