कुडाळ : चर्मकार समाजाच्या भवनासाठी माझा आमदार निधी दिला जाईल. तसेच समाजाचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडविले जातील, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. भारतीय चर्मकार समाजाचा भव्य स्नेहमेळावा व सत्कार सोहळा ओरोस येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेला ३४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संत शिरोमणी रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, विद्यार्थी सन्मान तसेच आरोग्य शिबिर कार्यक्रम जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री रवळनाथ मंदिर रंगमंच, ओरोस येथे झाला.यावेळी शिवसेना युवा नेते संदेश पारकर, भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, तानाजी परब, अरुण होडावडेकर, बाबा गवळी, जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, सुरेश चौकेकर, उद्योजक बाबल पावसकर, संजय निवळकर, विनायक कोडल्याळ, स्नेहा दळवी, विश्वनाथ चव्हाण, भारत पेंडुरकर, सी. आर. चव्हाण यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर आदी भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी आमदार नाईक म्हणाले, चर्मकार समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी तुमचा हक्काचा आमदार म्हणून काम करणार आहे. समाजाचे राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण हे राज्य पातळीवर समाज संघटना बांधणीचे फार मोठे काम करीत आहेत. त्यांना तुमची सर्वांची अशीच साथ मिळावी, असे ते म्हणाले.पंढरी चव्हाण म्हणाले, भारतीय चर्मकार समाजाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी कटिबद्ध होणे काळाची गरज आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना संघटना फार महत्त्वाची आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय चर्मकार समाज नेहमीच कार्यरत राहिला आहे.महिलांचा विशेष सन्मानइयत्ता दहावी, बारावी, पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच नवोदय परीक्षेत निवड झालेले शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी व आठवी) उत्तीर्ण, डॉक्टर, इंजिनिअर व वकिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजातील बचतगटांच्या ४०० हून अधिक महिला व इतर वर्गातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
चर्मकार समाज भवनासाठी निधी दिला जाईल : वैभव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 6:13 PM
Vaibhav Naik Sindhudurg- चर्मकार समाजाच्या भवनासाठी माझा आमदार निधी दिला जाईल. तसेच समाजाचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडविले जातील, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. भारतीय चर्मकार समाजाचा भव्य स्नेहमेळावा व सत्कार सोहळा ओरोस येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
ठळक मुद्देचर्मकार समाज भवनासाठी निधी दिला जाईल : वैभव नाईक ओरोस येथे चर्मकार समाजाचा स्नेहमेळावा : महिलांचीही उपस्थिती