शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

गडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 4:56 PM

भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगडनदी पुल अपघाताला ५१ वर्षे पूर्ण : आठवणीना उजाळा देत वाहणार आदरांजली !कणकवली, तेलीआळी येथे डबलबारी भजनाचा कार्यक्रम

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरीनामाचा गजर करण्यासाठी ट्रक मधून निघालेल्या भजन प्रेमींवर ५१ वर्षापुर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्यावतीने शनिवारी डबलबारी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजन प्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षि अर्जुन तावड़े बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजन प्रेमीना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला . तसेच तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावस्येच्या काळरात्री भजन प्रेमिवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील करती सवरती माणसे मृत झाली होती.

या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधितच पोहचली. या संकटसमयी अनेक व्यक्ति मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमीना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमीना सावंतवाड़ी तर वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५१ वर्षे त्यांचे कुटुंबिय तसेच कणकवली वासीय सुदर्शन मित्र मंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तेलीआळी येथे एकत्र येत भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिना आदरांजली वाहत आहेत. या अपघाताला या वर्षी ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्याना आदरांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे.यावेळी आमने सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कुडाळ , भरणी येथील बुवा विनोद चव्हाण व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलिआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग