शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

कुडाळ शहरात व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार, ८ जणांवर गुन्हा दाखल; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 2:12 PM

विविध संघटनांच्या वतीने आल्या होत्या तक्रारी

कुडाळ : व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार चालविणाऱ्या कुडाळ शहरातील ५ व्हिडीओ गेम पार्लरमध्ये कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर संबंधित मालकांवर ही याप्रकरणी नोटिसा बजावून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईत ४३ हजारांच्या रोख रकमेसह ४६ मशीन मिळून तब्बल ९ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी व इतर पोलिस कर्मचाऱ्यानी शनिवारी रात्री उशिरा कुडाळ शहरातील ओम साईराम व्हिडीओ गेम, साई दर्शन व्हिडीओ गेम, कुडाळेश्वर व्हिडीओ गेम, मुजीब व्हिडीओ गेम आणि म्युझिक व्हिडीओ गेम यांच्यावर छापा टाकला, यावेळी या ठिकाणी व्हिडिओ गेमच्या नावाखाली इलेक्ट्रिक मशीनद्वारे जुगार खेळण्यात आल्याचे निदर्शनास आले.याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण माळवे (३८, रा. कुडाळकर चाळ, केळबाई मंदिराजवळ), महादेश निषाद (३३, रा. रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ), भीमराव परगणी (४४, रा. डाॅ. आंबेडकरनगर, कुडाळ), संजय वाडकर (५२, रा. सबनीसवाडा- सावंतवाडी), रफिक अगडी (४६, रा. पिंगुळी म्हापसेकर, तिठा), वैभव सरमळकर (२७, रा. कदमवाडी, कुडाळ), शैलेशकुमार गुप्ता (३९, रा. सालईवाडा- सावंतवाडी), अक्षय धारगळकर (२९, रा. कुडाळमधली, कुंभारवाडी) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत सर्व व्हिडिओ गेम पार्लरवरमधील जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे ९ लाख २० हजार रुपये किमतीच्या ४६ मशीन, तसेच संशयित आरोपीकडे सापडलेली सुमारे ४३ हजार ५५० रुपये मिळून एकूण ९ लाख ६३ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ओमसाईराम व्हिडीओ गेम, साई दर्शन व्हिडीओ गेम, कुडाळेश्वर व्हिडीओ गेम, मुजीब व्हिडीओ गेम आणि म्युझिक व्हिडीओ गेम या व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करण्यात आली असुन, सर्व व्हिडीओ गेम मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर यांनी दिली.ही कारवाई कऱ्हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र भांड, हवालदार गणेश चव्हाण, कृष्णा केसरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली.

विविध संघटनांच्या वतीने आल्या होत्या तक्रारीयाबाबतची माहिती कुडाळ तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्या ठिकाणी व्हिडीओ गेमच्या नावावर जुगार खेळला आहे. त्यातून आर्थिक व्यवहार होत आहे, अशी तक्रार होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली, असे गणेश कऱ्हाडकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस