शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

कोकणातला गणपती वाटे आपलासा ! उत्सव म्हणजे दिवाळीच...

By shekhar.dhongade | Published: August 25, 2017 9:52 PM

जगाच्या कानाकोपºयातील चाकरमानी येणारच!शेखर धोंगडे --कोल्हापूरगणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी दिवाळीच. प्रत्येकाच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने येथे दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत उत्सवाची रंगत अनुभवण्यासारखी असते. डोंगरवाटा नि भातशेतीच्या डोलणाºया पिकातून डोक्यावरून येणारा गणराया म्हणजे कोकणवासीयांच्या उत्साहाला उधाण आणणाराच असतो.सिंधु महोत्सवाची धुळवड संपवून चाकरमानी मुंबईला निघतात ते ...

ठळक मुद्देकोकणातील गणेशोत्सव सर्वांनी एकदा तरी अनुभवावाच.जगाच्या पाठीवर कोठेही असणारा चाकरमानी हा हमखास येणारच भजनी मंडळे ही घरोघरी जाऊन आणखीनच घरात गणरायाच्या आगमनाची सुखद जाणीव करून देतात. डोंगरवाटा नि भातशेतीच्या डोलणाºया पिकातून डोक्यावरून येणारा गणराया म्हणजे ...

जगाच्या कानाकोपºयातील चाकरमानी येणारच!शेखर धोंगडे --कोल्हापूरगणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी दिवाळीच. प्रत्येकाच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने येथे दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत उत्सवाची रंगत अनुभवण्यासारखी असते. डोंगरवाटा नि भातशेतीच्या डोलणाºया पिकातून डोक्यावरून येणारा गणराया म्हणजे कोकणवासीयांच्या उत्साहाला उधाण आणणाराच असतो.

सिंधु महोत्सवाची धुळवड संपवून चाकरमानी मुंबईला निघतात ते पुन्हा सरत्या श्रावणानंतरच्या गणरायाच्या आगमनाची ओढ मनात घेऊनच. मस्त भारधस्त पावसानंतर धरणी, हिरव्या नक्षत्राची लेणं लेपून सजते... लतावेली, वृक्षांच्या पानापासून निसटते ते चैतन्यसृष्टीला वेगळेच तेज देते. डोलणारी कोकणातली भातशेतं, मांड, पोफळी सगळेच हात उंचावून आनंदाने सृष्टीतल्या नवनिर्मितीचे स्वागत करतात. अगदी त्याचप्रमाणे कोकणच्या गणेशोत्सवाचे चाकरमानीही अगदी तितक्याच श्रद्धापूर्ण वातावरणात स्वागत करतात.

कोकणातल्या दूरवर गर्द हिरव्या झाडीत लपलेल्या आणि लालचुटूक कौलांनी नटलेल्या घरात वेगळीच लगबग सुरू असते, ती म्हणजे गणेशोत्सवाची. वाडीवस्ती ते गावागावांतील प्रत्येक घराघरांत चाकरमान्यांच्या स्वागतासाठीही इथली मंडळी सज्ज झालेली असतात. महिना महिना आधी गावाकडे जाणाºया गाड्यांची, रेल्वेंची, आरक्षण येथे फुल्ल झालेली असतात. जगाच्या पाठीवर कोठेही असणारा चाकरमानी हा गणेशोत्वाला हमखास येणारच, हे कुणाला सांगायला नको.

घरातली स्वच्छता, सारवलेली अंगणे, रांगोळ््यांनी सजलेला उंबरा, गणरायाच्या प्रतिष्ठापनाची बैठक व्यवस्था व आजूबाजूचा परिसरही सुंदर, गणपतीजवळ केलेली आरासही नयनरम्य व तितकीच लक्षवेधी असते. त्यातच माजघरात दरवळणारी सुगंधी उदबत्ती, धूप गणरायाच्या प्रतिष्ठापनेची साक्ष देतो. गणरायाच्या आगमनाने व प्रतिष्ठापनेने संपूर्ण कोकणातल्या वाडीवस्तीमध्ये गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर आगळे-वेगळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आनंदी, उत्साही वातावरणाने सारे चाकरमानी व स्थानिक भारावून गेलेले असतात.

शेजारी-पाजारी, वाडीवस्तीवरती ताशांचा कडकडाट, तबलावादन, ढोलकीची साथ, घंटानाद, टाळ-मृदंगाचा नाद आणि आरतीच्या सुमधूर आवाजाचा तासन्तास स्वर टिपेला जातो. भजन आणि भजनाच्या चढाओढीत अबालवृद्धांपासून सारेचजण यात रमलेले असतात. त्यानंतरची प्रसाद वाटपाची लगबग, खाणाºयाला आणि वाटणाºयाला दोघांनाही आनंदाची वाटते. महानैवेद्याच्या उखडीच्या मोदकाच्या चवीने अवघ्या तनमनाला समाधान व तृप्ती लाभते.

संपूर्ण गणेशोत्सवात नाच, नमन, खेळ््ये, पत्त्यांचे डाव उत्तरोत्तर रंगलेल्या डावात अगदी गणेशोत्सवाचे एकामागून एक दिवस सरत असतात. जोडीला वाड्यावस्त्यांवरील व गावांतील भजनी मंडळे ही घरोघरी जाऊन आणखीनच घरात गणरायाच्या आगमनाची सुखद जाणीव करून देतात. दररोज होणाºया भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने तर संपूर्ण कोकणचे वातावरण हे गर्द अंधारातही मनशांती देणारा वाटतो.

इथल्या गणरायाच्या आरतीला दररोज वाडीवस्तीवरील सर्वजण एकमेकांच्या घरी उपस्थित राहून रंगत वाढवितात. अशा या गणरायाचे भक्तीमय वातावरणात होणारे आगमन म्हणजे कोकणवासियांची खºया अर्थाने दिवाळी व महोत्सवच असतो. सर्वांना आपलासा वाटणाºया या गणरायाच्या जोरदार स्वागत झाले आहे. कोकणातील गणेशोत्सव सर्वांनी एकदा तरी अनुभवावाच.