शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 2:12 PM

' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात शनिवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन !

सुधीर राणेकणकवली : ' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात शनिवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाचे काहीसे सावट यावर्षीच्या गणेशोत्सवावर आहे.सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महीना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच शनिवारी गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली.गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी गुरुवारी तर काही जणांनी शुक्रवारी श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या. तर काही ठिकाणी शनिवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती. ढोल ,ताशांचा गजर जरी मोठ्या प्रमाणात ऐकू येत नसला तरी फटाक्यांची आतषबाजी अनेक ठिकाणी सुरू होती.श्री गणेश मुर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकविस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वानी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच अन्य धार्मिक विधि करण्याचा परिपाठ सुरु झाला आहे. तो श्री गणेश मूर्ती विसर्जनापर्यन्त सुरु रहाणार आहे.प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणिस, एकविस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे. यावर्षी कोरोनामुळे गणरायाना कमी दिवस आपल्या घरी ठेवण्याचे नियोजन काही भाविकांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. प्रशासन ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे.तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे.अनेक ठिकाणी पुरोहितांच्या अनुपस्थित पूजा !अनेक घरात दरवर्षी पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेश मुर्तीची स्थापना तसेच विधिवत पूजन करण्यात येते. अनेक ठिकाणी पुरोहिताना पुजेसाठी आमंत्रण देण्यात आलेले असल्याने यजमानांच्या घरी पूजनाची वेळ साधण्यासाठी सकाळ पासूनच अनेक पुरोहितांची लगबग सुरु असते.मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरोहितांच्या अनुपस्थितीत अनेक ठिकाणी पूजा करण्यात आली. त्यासाठी विविध पूजा अँपची मदत घेण्यात आली.मृदंग, तबल्याच्या साथीने आरतीचे स्वर उमटले!घरोघरी गणरायाचे विधिवत पूजन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली. तर घरात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वाट पहाणाऱ्या लहान थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ, ढोलकी, मृदंग, तबला, हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले.पावसाच्या उघडीपीने दिलासा!श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळ पासूनच पावसाने उघडीप दिल्याने भाविकाना दिलासा मिळाला. तसेच श्री गणेश मूर्ती घरी आंणताना होणारी तारांबळ टाळता आली. त्यामुळे भाविकानी गणरायाचे आभार मानले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग