शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

पाठलाग करून पकडली संशयितांची टोळी

By admin | Published: March 30, 2016 1:16 AM

लाखोंची रोकड सापडली : कडवई येथील तरुणांचे धाडस; संशयित गुजरातची नावे आहेत.

देवरुख / आरवली : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे कडवईतील काही तरुणांनी संशयित चोरट्यांची टोळी लाखोच्या रोकडसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. चित्रपटात शोभेल अशाच पद्धतीने हा थरारक पाठलाग करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ९ ते ११ च्या सुमारास घडली. ही टोळी पकडणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पत्रकार मिलिंद चव्हाण, शैलेश चव्हाण, रिक्षा चालक विनायक तुळसणकर यांचे पोलिसांनी कौतुक केले.सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास संगमेश्वरहून सावर्डा येथे भाडे घेऊन रिक्षाचालक सचिन जंगम हा चार व्यक्तींना घेऊन निघाला होता. प्रवासात या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सचिनच्या मनात भीती निर्माण झाली. म्हणून त्याने तुरळ रिक्षा स्टॅण्डला आपली रिक्षा थांबवून रिक्षाचालक विनायक तुळसणकर याच्याकडे मदत मागितली. तुळसणकर यांनी रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांना भ्रमणध्वनीवरून याबाबत माहिती दिली. चव्हाण यांनी आपण पोहोचेपर्यंत संबंधितांना थांबवून ठेवण्यास सांगितले. चव्हाण यांनी तत्काळ संगमेश्वर पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. मात्र, मधल्या कालावधीत संबंधित चार संशयित पलायन करण्यात यशस्वी झाले. दरम्यान जितेंद्र चव्हाण, शैलेश चव्हाण, मिलिंद चव्हाण, दीपक चौगुले, विनायक तुळसणकर यांनी ग्रामस्थांना कल्पना देऊन संबंधितांचा शोध चालू केला. याचवेळी संगमेश्वरवरून पोलिसांची गाडीही तुरळ येथे दाखल झाली. गणपती मंदिर परिसरात पोलिसांना दोन संशयित सापडले. त्यांनीही पळण्याचा प्रयत्न केला होता; पण शैलेश चव्हाण यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पोलिस संबंधितांना घेऊन संगमेश्वर पोलिस ठाण्याकडे रवाना झाले.याच दरम्यान रात्री १०.३० वाजता जितेंद्र चव्हाण, शैलेश चव्हाण, मिलिंद चव्हाण, विनायक तुळसणकर, दीपक चौगुले यांनी तुरळ मराठवाडी परिसरात संशयितांचा शोध घेतला असता ते पळण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. या तरुणांनी त्यांना पाठलाग करून पकडले आणि चोप दिला. त्यावेळी त्यांच्याजवळ १०० आणि ५०० च्या नोटांची लाखो रुपयांची रक्कम आढळली. शंकर बाबू ठाकू र (वय ४५, अलवानाका, बडोदा, गुजरात), मनू जगू बसिया ऊर्फ संतोष किसन ठाकूर (४५, अलवानाका, बडोदा), राजू देवा धनगर (४०, बेडद, जम्बूशहा, जि. बरूच, गुजरात) आणि यलूर मोहन माळी (४२, गामेण, गुजरात) अशी त्यांची नावे आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी तत्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांना दिली. याबाबत संबंधितांजवळ चौकशी केली असता आपण शटरचे काम करणारे कामगार असून, सावर्डा येथे भवानी मंदिराजवळ राहतो. ही रक्कम आपण मालकाच्या गाडीतून चोरली असल्याचे कबूल केले.या तरुणांनी दोन्ही संशयित आणि रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली असून, पोलिस निरीक्षक मनोहर चिखले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)चौकटमोठे रॅकेट?दरम्यान, हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, किती दिवसांपासून हे संशयित चोरटे असा प्रकार करीत होते, हे तपासात पुढे येणार आहे. या चोेरट्यांकडून कटावणी स्क्रू ड्रायव्हर, पाने, पक्कड या साहित्यशिवाय चोरीसाठी वापरावयाचे साहित्यदेखील ताब्यात घेतले आहे. मध विक्रेते म्हणून आले अन्...चिपळूण येथील प्रशांत अनंत जाधव (वय ३८, रॉयलनगर चिपळूण) हे गेली १६ वर्षे बिल्डिंगकरिता लागणाऱ्या वायरिंगची कामे ठेकेदार पद्धतीने घेत होते. त्यांच्याकडे शंकर ठाकूर व मनू बारिया हे दोघेजण गावठी मध विकण्यासाठी आले होते. सलग दोन तीनवेळा ते मध विकण्यासाठी आल्याने जाधव यांनी त्यांना याबाबत विचारले. त्यांनी देवरुखच्या जंगलात आम्ही लाकडे तोडत आहोत, तेथे आम्हाला मध मिळतो, असे सांगितले. काही दिवसांनी शंकर ठाकूर हा जाधव यांच्याकडे आला व त्याने आपल्या वडिलांना खोदकाम करताना सोने मिळाले आहे, ते विकायचे आहे, तुम्ही घेणार का? असे विचारले. त्याने एक सोन्याचा मणीही दिला. त्यानंतर सोन्याचा व्यवहार ठरला.