शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

Ganpati Festival : सिंधुदुर्गात उद्यापासून गणेशोत्सव, ३५ सार्वजनिक, ६८२९१ घरगुती गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:25 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात उद्यापासून गणेशोत्सव, ३५ सार्वजनिक, ६८२९१ घरगुती गणपती गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण, जय्यत तयारी सुरू

सिंंधुदुर्गनगरी : सुखकर्ता... दु:खहर्ता अशी ख्याती असणाऱ्या लाडक्या बाप्पाचे आगमन गुरुवार १३ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.कोकणात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे आणि परगावी असणारे चाकरमानी आपापल्या गावी येतात. एक दिवसावर आलेला हा गणेशोत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो.

आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला होणार आहे. प्रामुख्याने कोकणात घराघरात गणेशोत्सव श्रद्धेने साजरा होतो. मुंबई व अन्य ठिकाणी असलेले जिल्हावासीय चाकरमानी या निमित्ताने आपापल्या गावी येतात. दीड दिवसापासून ११ दिवसांपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत हा सण साजरा होतो.काही नवसाचे गणपती अनंत चतुर्दशीनंतरही थांबतात. हा सण सुरळीत व शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन खबरदारी घेत असून यानिमित्त वाढलेली वाहतूक सुरळीत रहावी यासाठी प्रशासनाचा कटाक्ष असतो. रेल्वेनेही यावर्षी मोठ्या प्रमाणात गणपतीसाठी खास गाड्या कोकणात सोडल्या आहेत.याशिवाय मुंबई-गोवा महामार्गावर खासगी व एसटीची बससेवा तसेच आपापल्या खासगी वाहनातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी भाविक दाखल होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानके, बस स्थानके या गर्दीने फुलली आहेत.

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गणपतीच्या शाळा गजबजल्या असून मूर्तिकार मूर्तिवर अखेरचा हात फिरविण्याच्या गडबडीत आहेत. काही गणपती शाळांमधून तर बाप्पाला आपल्या घरी नेण्याचे काम सुरू झाले आहे.वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून व भाविकांना आपल्या घरी सुरक्षित पोहोचता यावे म्हणून पोलीस प्रशासनाने यावर्षी चांगले नियोजन केले आहे. ४३ ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार असून त्याठिकाणी १८१ पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत.यात १७ फिक्स पॉर्इंट असून त्यावर ६८ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ९ राहुटी पॉर्इंट असून त्यावर ५४ कर्मचारी तैनात, ७ ठिकाणी जीप पेट्रोलिंग असणार असून त्यासाठी २६ कर्मचारी तैनात तर १० ठिकाणी दुचाकी पेट्रोलिंग असणार असून त्याठिकाणी ३४ कर्मचारी तैनात असणार आहेत. काही ठिकाणी वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत.सिंधुदुर्ग राजासह ३५ ठिकाणी सार्वजनिक गणपतीकुडाळ येथील सिंधुदुर्गचा राजा यासह ३५ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव होत आहे. यामध्ये दोडामार्ग ५, बांदा २, वेंगुर्ला ३, कुडाळ ६, सावंतवाडी ८, मालवण २, आचरा १, कणकवली ७ आणि देवगड १ असे ३५ सार्वजनिक गणेशोत्सव त्या त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होत आहेत.सावंतवाडीत सर्वाधिक ९७0४ घरगुती गणपतीघरगुती गणेशोत्सवामध्ये दोडामार्गमध्ये ४८३२, बांदा २५८०, वेंगुर्ला ४९५५, कुडाळ ८६३९, सावंतवाडी ९७०४, निवती ३२६९, सिंधुदुर्गनगरी २२९५, मालवण ४६९०, आचरा २४२५, कणकवली ९६२०, देवगड ६६७९ तर विजयदुर्ग ३२६३ अशी ६८ हजार २९१ कुटुंबे गणरायाचे पूजन करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग