सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव येथील शासकीय वनसंपदेत शिकारीच्या उद्देशाने वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाने आज, शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बाॅम्बसह दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.याबाबत माहिती अशी, आंबेगाव येथील शासकीय जंगलात वृक्षतोड व शिकार यांचेवर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशाने जंगलात गस्त सुरू असतानाच वन विभागाच्या गस्ती पथकास आंबेगाव येथे तीन युवक जंगलात गावठी बॉम्ब पेरताना दिसून आले. याबाबत वनविभागाकडून चौकशी केली असता त्यांनी आपण शिकारीसाठी आल्याचे कबुल केले. यात अबीर प्रकाश आंगचेकर (वय-५० खालचीवाडी रा. सांगेली), चंद्रकांत शंकर दळवी (५०, म्हारकटेवाडी रा.आंबेगाव), शांताराम गोपाळ राऊळ (४६ टेंबकरवाडी रा.सांगेली) या तिघांना ताब्यात घेतले.यातील अबीर आंगचेकर याला पळून जाताना ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून गावठी बॉम्ब सह दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर वनरक्षक आंबेगाव दत्तात्रय शिंदे, वनरक्षक फिरतेपथक प्रमोद जगताप, वनरक्षक कोलगाव सागर भोजने, वनरक्षक इन्सुली संग्राम पाटील यांनी केली. अधिक तपास सावंतवाडी वनविभागाकडून करण्यात येत आहे.
Sindhudurg: शिकारीच्या उद्देशाने गावठी बॉम्ब पेरले, आंबेगाव जंगलात तिघेजण ताब्यात
By अनंत खं.जाधव | Published: May 31, 2024 1:03 PM