शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

घुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 5:58 PM

Tauktae Cyclone Help Sindhudurg : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या आणि विकासापासून वंचित असलेल्या कातकरी बांधवांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला, अशी माहिती घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळित यांनी दिली.

ठळक मुद्देघुंगुरकाठी संस्थेतर्फे वडाचापाट कातकरी वस्तीवर साहित्य वाटप राजीव कुबल, मंगेश सामंत यांचा पुढाकार : सतीश लळित यांनी दिली माहिती

ओरोस : मालवण तालुक्यातील वडाचापाट धरण परिसरात राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील १४ कुटुंबांना घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग स्वयंसेवी संस्था आणि मुंबई येथील ऊर्जा मुव्हमेंट यांच्यावतीने ३५ हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या आणि विकासापासून वंचित असलेल्या कातकरी बांधवांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला, अशी माहिती घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळित यांनी दिली.यासंदर्भात माहिती देताना लळित म्हणाले की, तौक्ते वादळाचा फटका बसून वडाचा पाट धरण परिसरात गेल्या ४० वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजबांधवांच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळाली. काल या वस्तीला भेट दिल्यावर झोपड्यांमध्ये पाणी गेल्याने धान्य व अन्य साहित्याचे नुकसान झाल्याचे निदर्शनाला आले. या पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर व प्रसाद जळवी उपस्थित होते.वादळाला आठ दिवस उलटून गेल्यावरही या वस्तीवरील रहिवाशांना कोणतीही मदत मिळालेली नाही, असे लक्षात आल्यावर मुंबईतील ह्यऊर्जा मुव्हमेंटह्णचे निवृत्त नौदल अधिकारी कमांडर राजीव कुबल आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश सामंत यांना त्याची कल्पना दिली.

मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलले कुबल व सामंत यांनी या कुटुंबांना मदत करण्याबाबत अनुकूलता दाखवली. त्यानुसार घुंगुरकाठीच्या माध्यमातून आज वडाचा पाट धरण परिसरात राहणाऱ्या १४ कातकरी कुटुंबांना प्रत्येकी रु. २५०० किमतीच्या एकूण ३५ हजार रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.या प्रत्येक किटमध्ये २५ किलो तांदूळ, कडधान्ये, मसाले, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, कांदे, बटाटे, साबण अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता. वस्तीवर झालेल्या एका छोट्याशा कार्यक्रमात या साहित्याचे वाटप करण्यात आले.मदत पोहोचवता आली याचे समाधान : लळितसमाजातील ह्यनाही रेह्ण वर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व ज्यांच्या अस्तित्वाची दखलही नाही, अशा आदिवासी कातकरी कुटुंबांना अल्पशी का होईना, मदत पोहोचवता आली याचे समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया सतीश लळित यांनी व्यक्त केली. आधुनिक जगात वावरणाऱ्या आणि विकासाची फळे चाखणाऱ्यांना या कातकरी बांधवांच्या दैन्याची कल्पनाही करता येणार नाही. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जवळ आला तरी विषमतेची दरी आपण सांधू शकलो नाही, याचा खेद आहे. मात्र त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत पोचू शकलो, यांचा आनंद आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा