सावंतवाडी : शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर अत्याचारीत मुलगी आपल्या नातेवाईकांसह शनिवारी येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आली होती. तक्रार देतानाच मुलीच्या फोनवर मुख्य फोन वाजला आणि तो तिला ‘तू कशी, कुठे आहेस,’ असे प्रश्न करू लागला. यावेळी मुलीने दाखविलेले धाडस आणि पोलिसांनी दाखविलेला चाणाक्षपणा यामुळेच रामचंद्र घाडीला घटना घडली तेथून ताब्यात घेणे सोपे झाले.थोडासा जरी विलंब झाला असता तर आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे आरोपी मिळणेही पोलिसांना कठीण बनले असते. पण अवघ्या बारा तासात या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. शुक्रवारी मुलगी आपल्या मित्रासमवेत सावंतवाडीतील एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये थंडपेय पित होती. ती मुख्य आरोपी रामचंद्र घाडी याच्या नजरेस पडली. त्याने तिला ब्लॅकमेलिंग करून मळगाव येथील ‘त्या’ लॉजवर घेऊन गेला. तेथे सायंकाळी सात वाजता पोहोचला आणि तेथून तो रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खाली उतरला होता. त्या लॉजवर रामचंद्र याने आपले नाव घातले आहे. पण मुलीचे नाव नाही. रात्री खाली उतरल्यावर मळगाव येथील त्याचे ते दोघे मित्र लॉजच्या खालतीच उभे होते. रामचंद्रने मुलीला या दोघांच्या ताब्यात दिले. त्यांनी तिला जुन्या रेल्वे फाटकावरून दुचाकीवर बसवून तीन नंबर प्लॉटवर आणले. तेथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पहाटेपर्यंत अत्याचार केला. सकाळी मुलीला जाग आली तेव्हा या दोघा नराधमांना बघून ती थोडी घाबरली. तिला काहीच समजेना. तिने थेट कोल्ड्रिंग हाऊसमध्ये सोबत असलेल्या मित्राला फोन लावला. त्या मित्राला तिने सर्व घटना सांगितली. त्याने तिला तिच्या आई- वडिलांच्या ताब्यात दिले. आई-वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता शनिवारी दुपारी पोलीस ठाणे गाठले.पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना ही माहिती दिली. घटनेची माहिती घेतानाच पोलिसांना तक्रारीचे गांभीर्य वाटले. त्यांनी यातील आरोपींना कसे अटक करता येईल याचा विचार केला. तेवढ्यातच मुलीच्या मोबाईलवर मुख्य आरोपी रामचंद्र याने फोन केला. पोलिसांनी तो फोन उचल आणि काय म्हणतो ते बघ, असे सांगितले. यावेळी रामचंद्र हा त्या मुलीची फोनवर चौकशी करू लागला. ‘तू कुठे आहेस, कशी आहेस’ असे प्रश्न विचारतानाच तिने मी अजून मळगाव येथे रेल्वे स्थानकावर आहे, असे सांगितले. तू तेथे ये, मला तुझ्याशी बोलायचे, असे म्हटले. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास ठरल्याप्रमाणे आरोपी त्या मुलीला भेटण्यासाठी रेल्वे स्थानकावर आला आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी कौशल्य पणाला लावत पहिल्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढचा तपास पोलिसांना सोपा झाला होता.मुख्य आरोपीच्या तोंडातून इतर दोन आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास मळगाव येथील राकेश व प्रशांत राऊळ या दोघा जुळ्या भावांना ताब्यात घेतले. पहाटे पोलीस घरी आल्याने राऊळ कुटुंबीय चांगलेच चक्रावले. पण आपण केलेल्या कृत्यात फसलो हे त्यांना कळले होते. कारण मळगाव येथील ‘त्या’ लॉजवर नेण्याची कल्पना ही प्रशांत आणि राकेश यांचीच होती. रामचंद्रला त्यांनी ‘तू या लॉजवर घेऊन’ असे या दोघांनी सांगितले होते. कारण मळगाव येथील या लॉजवरही अनेक जण एक तास-दोन तासांसाठी येत असतात. अनेकांची येथे एन्ट्रीच नसते. असा प्रकार स्थानिक राजकीय पदाधिका-यांनी पोलिसांना सांगितला आहे. तर मळगाव येथील प्रशांत व राकेश हे दोघेही पहिल्यापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक वेळा या दोघांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या, पण कारवाई करण्यासाठी ठोस कारण मिळत नव्हते. तसेच जी कार वापरत होते, त्या कारमध्ये सतत कटावणी होती. त्यामुळे पोलीसही कटावणी ठेवण्यामागचे कारण शोधणार आहेत.
मुलीची चौकशी रामचंद्राच्या आली अंगलट, 12 तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:33 AM