शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्या ! ;- शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 5:23 PM

त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवली तहसीलदारांना निवेदन

 

कणकवली : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान  भरपाई राज्यपालांनी मंजूर केली आहे . मात्र , ही भरपाई आम्हाला मान्य नाही.  हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये भरपाई द्यावी , अशी मागणी यापूर्वी आम्ही केली होती . त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

       कणकवली तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने  सोमवारी तहसिलदार आर . जे . पवार यांची भेट घेऊन अवकाळी पाऊस नुकसाणीबाबत चर्चा केली.  तसेच मागण्यांबाबत  निवेदनही दिले . यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , तालुकाप्रमुख शैलेश भोगले , प्रथमेश सावंत , संदेश पटेल , अॅड . हर्षद गावडे , महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम सावंत - पालव , उपजिल्हाप्रमुख राजू शेटये , सुजित जाधव , नगरसवक सुशांत नाईक , माहि परूळेकर , कन्हैया पारकर , प्रतिक्षा साटम , साक्षी आमडोसकर , राजू राठोड , राजू राणे , प्रसाद अंधारी , शेखर राणे , भालचंद्र दळवी . धनंजय सावंत , शरद वायंगणकर , रुपेश आमडोसकर , बंडू ठाकूर , अविनाश सापळे , उमेश घाडीगांवकर , दिलीप मर्ये , रिमेश चव्हाण , संजना कोलते , आनंद आचरेकर , प्रतिक्षा साटम , मिनल म्हसकर , विलास गुडेकर , जयबा कुरेशी , आनंद आचरेकर , सोमा गायकवाड , नासिर खान , अनुप वारंग , वाय . डी . सावंत यांच्यासहीत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

            यावेळी कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६०७२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे . त्याबाबत पंचनामे करून अहवाल गेला असून आतापर्यंत १ कोटी १५ लाख रुपये जमा झालेले आहेत . रक्कम तत्काळ वाटप करण्यात येत असल्याचे तहसिलदार पवार यांनी स्पष्ट केले .          शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रती हेक्टरी ५० ते ६० हजार खर्च येतो . मात्र , राज्यपालांनी ८ हजार रुपये हेक्टरी भरपाई जहिर केली . ती भरपाई तुटपुंजी आहे . शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तरी भरपाई मिळाली पाहिजे . तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचे प्रती हेक्टरी ६ हजार रुपये अद्याप जमा झालेले नाहीत . ही रक्कम त्वरीत जमा झाली पाहिजे . पिक विमा योजनेची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही . ती लवकरात लवकर मिळावी .

         बऱ्याच ठिकाणी शेतकरी कसत असलेले क्षेत्र हे देवस्थान इनाम किंवा कुळ अगर तोंडी कराराने कसत असतात . त्यामुळे भरपाईची रक्कम अदा करताना खात्री करण्यात यावी . खरीप हंगामामध्ये जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून जिल्ह्यात सुमारे ८० कोटी एवढी रक्कम पिक कर्ज म्हणून वाटप करण्यात आलेली आहे .

             या पिककर्जाचे मुद्दल व व्याज माफ करण्यात यावे . ज्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे . अशांच्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवर पंचनामा  होऊन त्यांनाही योग्य ती भरपाई मिळावी . अतिवृष्टीमुळे गुरांसाठी असलेला  चारा कुजून गेला आहे . त्यामुळे पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी अनुदान वा चारा छावणी उभारण्यात यावी .

             तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक खावटी कर्ज घेतेलले आहे . या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ खाली कर्जमाफी जाहिर झाली असून त्यांचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना नविन कर्ज घेता येत नाही व व्याजाचा बोजाही वाढत आहे .त्यामुळे खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली . शेतकरी सन्मान योजनेची रक्कम जिल्हा बँकेतील खात्यांमध्ये जमा होत नाही , ती होण्याच्यादृष्टीने कार्यवाहीची करण्यात यावी . अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

कणकवली तहसीलदार आर जे पवार यांना सोमवारी शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संदेश पारकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सुजित जाधव, नीलम सावंत- पालव , हर्षद गावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना