ओरोस : गेली अनेक वर्षे कुपवडे -बौद्धवाडीतील ग्रामस्थांना रस्ता, पिण्याच्या पाण्यासारखी समस्या भेडसावत असून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीत अनेकवेळा लक्ष वेधूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे व बौद्धवाडीला सरकारी योजनांपासून वंचित ठेवत असल्याने सोमवारी कुपवडे-बौद्धवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.कुडाळ तालुक्यातील कुपवडे- बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषण सुरू केले आहे. या वाडीत जाणाऱ्या जोडरस्त्याची मागणी, वीज, पाणी अशा अनेक समस्या या ग्रामस्थांना भेडसावत आहेत. तसेच शासनाच्या अनेक योजनांपासून बौद्धवाडी ग्रामस्थ वंचित आहेत. याला कुपवडे ग्रामपंचायत जबाबदार आहे. अनेकवेळा पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून तसेच लेखी स्वरूपात अनेक वेळा समस्या मांडण्यात आलेल्या आहेत. मात्र, बौद्धवाडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण सुरू केले आहे. यामध्ये ग्रामस्थ व मुंबईस्थित ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष सुनील तांबे, हरी सकपाळ, सखाराम तांबे, रमेश तांबे, सुभाष तांबे, मनोहर कदम, विष्णू तांबे, वसंत तांबे, पार्वती तांबे, जानकी कदम, भारती तांबे आदी उपोषणास बसले होते. (वार्ताहर) देवस्थान कमिटी-अभियंता यांची बैठक यावेळी बौद्धवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेतली. या दरम्यान देवस्थान कमिटी व पाणीपुरवठा अभियंत्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले.महिन्यानंतर पुन्हा उपोषण करणारजर आमच्या वाडीतील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही कुपवडे-बौद्धवाडीतील ग्रामस्थ एप्रिलच्या २१ तारखेला उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.
प्यायला पाणी, चालायला रस्ता द्या
By admin | Published: March 21, 2016 9:02 PM