शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

पूर्वांचलकडे चला! परिस्थितीची दखल घ्या

By admin | Published: December 22, 2014 12:20 AM

प्रतिभा आठवले : देवगडात बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमाला

देवगड : बांगलादेश, चीन व म्यानमार सदैव पूर्वांचलच्या नागरिकांना अशांत ठेवून हा भाग बळकावण्याच्या प्रयत्नात असतात. अशावेळी उर्वरित भारतीयांनी या भागाशी सातत्यपूर्ण व प्रभावी संपर्क ठेवून या भागाचा मुलभूत विकास केला तरच येथे काश्मिर किंवा पूर्वीच्या पंजाबसारखी स्थिती उत्पन्न होणार नाही. तेव्हा पूर्वांचलाकडे चला, असा संदेश अहमदाबाद येथील अभ्यासक प्रतिभा आठवले यांनी व्याख्यानात देवगडवासीयांना दिला.पूर्वांचल हा निसर्गाने पूर्ण वरदहस्त ठेवलेला अतिरमणीय परंतु दुर्गम व निसर्गसंपन्न भूभाग आहे. भारतावर सूर्याची पहिली किरणे अरुणाचलमध्येच पडतात. हा भाग सात राज्यांचा आहे. परंतु सातही राज्यात शेकडो आदिवासी (जमाती) निवास करतात. त्यांची भाषा पूर्ण वेगळी आहे. त्यांच्यात संवाद नाही. त्यामुळे परकीय शक्ती या सर्वात फूट पाडून येथील प्रशासन खिळखिळे करत आहेत. त्याची दखल वेळीच घेतली नाही तर येथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. हे वेळीच रोखले पाहिजे, असा स्पष्ट इशारा डॉ. प्रतिभा आठवले यांनी दिला.पूर्वांचलमधील मुख्य नदी ब्रह्मपुत्रा आहे. तिचा १६०० किलोमीटर प्रवास तिबेटमधून व भारतातून दक्षिणेकडे ९०० किलोमीटर प्रवास करून ही नदी बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते. तिचा प्रवाह अत्यंत अनियमित आहे. म्हणून येथे विकास हळूहळू होत आहे. ब्रह्मपुत्रा इतकी विशाल आहे की, तिचा विरूद्ध किनारा अनेक ठिकाणी नुसत्या नजरेला दिसत नाही. दोन्ही बाजूला उंच कडे व डोंगर आहेत. या भागात जलमार्ग किंवा मोटारीने प्रवास करावा लागतो, अशी माहिती त्यांनी दिली. रामायण-महाभारताचे उल्लेख त्यांनी या भागाविषयी करुन पौराणिक काळापासून आधुनिक युगापर्यंत या भागाचे संदर्भ मिळतात.या भागाचे निसर्गवैभव वर्णन करताना त्यांनी सुमारे ३०० विविध आर्किडच्या प्रजाती, बांबू, चहा, खळ यांचे मळे यामुळे हा भाग निश्चितच वैभवसंपन्न आहे. मात्र, लिपीचा अभाव व प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर बदलणारी भाषा यामुळे या भागातील जनतेचा एकमेकांशी व उर्वरित भारताशी संपर्क नाही.सांस्कृतिकरित्या या भागाच्या ट्राईब्ज एकलव्य, रुक्मिणी, गंधर्व-अप्सरांचे वंशज असल्याचे सांगतात. भगवान परशुरामांचा वास या भागात होता. या भागातील लोकांचे सांस्कृतिक जीवन, खाद्यसंस्कृती व करमणूक यासह भाषा व चालीरिती यांवरही आठवले यांनी विस्तृत भाष्य केले. सध्याच्या परिस्थितीत परकीय शक्तींच्या प्रयत्नांना विरोध करून या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी व त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी स्वत: आठवले या सात ते आठ ठिकाणी डेंटल क्लिनिक चालवून स्वखर्चाने त्यांची सेवा करीत असल्याचा खास उल्लेखही त्यांनी केला. (प्रतिनिधी)