गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोसह 55 हजार रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू बांदा येथे जप्त करण्यात आली असून याप्रकरणी संजय मारूती गवस (42 रा. मधलीवाडी वाफोली) याला अटक करण्यात आली आहे.ही आज सकाळी करण्यात आली आहे.
कारवाईत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर श्री. बी. एच.तडवी, यांचे आदेशाने निरीक्षक . एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक. आर. जी. येवलुजे, दुय्यम निरीक्षक. एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दिपक कापसे यांनी सहभाग घेतला.