शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोली घाटात फेकला; प्रेमप्रकरणातून घडली घटना

By अनंत खं.जाधव | Published: September 01, 2023 5:41 PM

हे प्रकरण २९ ऑगस्टला गोवा पर्वरी येथे घडले आहे प्रकाश चुंचवाड (२२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये अन्य एकाचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणने आहे. या दोघा आरोपींना आंबोली येथे आणण्यात आले आहे.

सावंतवाडी - पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील कामाशी शंकर उडपनव (28) या युवतीचा प्रियकराने खून करून मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवापोलिसांच्या तपासात शुक्रवारी उघड झाला. संशयित आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर गोवासिंधुदुर्ग पोलिसांचे पथक आंबोली घाटात पोचले असून त्यांना तो मृतदेह सापडला असून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

हे प्रकरण २९ ऑगस्टला गोवा पर्वरी येथे घडले आहे प्रकाश चुंचवाड (२२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये अन्य एकाचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणने आहे. या दोघा आरोपींना आंबोली येथे आणण्यात आले आहे.

कामाशी उडपनव ही तिच्या गोवा पर्वरी येथील फ्लॅटवर एकटी राहात असल्याची संधी साधून बुधवारी 30 ऑगस्ट ला दुपारच्या सुमारास आरोपीने चाकूने भोसकून खून केला होता. तो मृतदेह गाडीतून आणून त्याच दिवशी रात्री आंबोली घाटात फेकला होता. दरम्यान आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने २९ ऑगस्टला म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार तपास म्हापसा पोलिसांनी केला. यात ताब्यात घेण्यात आलेल्या प्रकाश याने युवतीचा खून केल्याची कबुली दिली . त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन गोवा पोलिसांचे एक पथक शुक्रवार आंबोली येथे दाखल झाले आहे. त्यानंतर घाटात शोध मोहीम राबविण्यात आली असून हा मृतदेह खोल दरीत तिचा मृत्यू दिसून आला मात्र आंबोली घाटात मोठ्याप्रमाणात पाऊस असल्याने मृतदेह वर काढण्यात अडचणी येत आहेत.सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह दोन दिवसापूर्वीच टाकण्यात आला आहे.मृतदेह मिळाला आहे.यात आरोपीला अन्य एका त्याच्या मित्राने सहाय्य केले असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान हा गुन्हा गोवा येथे दाखल झाला असल्याने गोवा पोलिस सर्व सोपस्कार हे तिकडेच करणार असल्याचे पोलीस निरीक्षक त्रषिकेश अधिकारी यांनी सांगितले तसेच मृतदेहाची उत्तरीय तपासणी ही गोवा बांबुळी येथे करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :goaगोवाsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस