रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १५९७ विविध शासकीय कार्यालयांनी महावितरणची ५५ लाख ९३ हजार ९१३ रुपयांची देयके थकविली आहेत. पैकी जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या ५८४ कार्यालयांकडे ४२ लाख ३४ हजार ९८० रूपयांची थकबाकी शिल्लक आहे.केंद्र शासकीय कार्यालयांकडे २,४२२, राज्य शासकीय कार्यालयांकडे ३१ हजार ८८४ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १२६ कार्यालयांकडे ४६ हजार १८७ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. जिल्हा परिषदेच्या ५१ कार्यालयांकडे ३४ हजार ५३५ रुपये, क वर्ग नगरपालिकेकडे २ हजार ७०८, ७१ ग्रामपंचायतींकडे ५४ हजार ३०९, सामान्य प्रशासन विभागाच्या १२ कार्यालयांकडे १ लाख ६८ हजार ३६७ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. नियोजन विभागाकडे ९३६, तर पोलिसांच्या ५५ कार्यालयांकडे ४ लाख १८ हजार ७९६ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.महसूल व वन खात्याच्या २४ कार्यालयांकडे ८५ हजार ९४८ रुपये, सहकार कार्यालयाकडे ३,४३१, तर राज्य शासन शिक्षण विभागाच्या १०५ कार्यालयांकडे ९१ हजार ४२३ रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. वित्त विभागाकडे १४ हजार १३, विधी व न्यायालयाकडे २३२८, राज्य शासनाच्या सार्वजनिक विभागातील १० कार्यालयांकडे १३ हजार ३४३, आरोग्य विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या ९ कार्यालयांकडे ८,१७०, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २७ कार्यालयांकडे ८९ हजार २२४, औषध प्रशासनाच्या ५१ कार्यालयांकडे ४० हजार ८४८, शासकीय कृषी कार्यालयांकडे ५,९३६, उच्च व तंत्रशिक्षण कार्यालयाकडे ५६६, पर्यावरण विभागाच्या तीन कार्यालयांकडे २,०२४, सहा औद्योगिक वसाहतींकडे ३६,१७७, केंद्र शासनाच्या सात सार्वजनिक कार्यालयांकडे १३,०११, तर राज्य शासनाच्या ३३ कार्यालयांकडे १ लाख ७९ हजार ३० रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. सर्वाधिक थकबाकी पाणीपुरवठा विभागाची आहे. जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या ५८४ कार्यालयांकडे ४२ लाख ३४ हजार ९८० रूपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यात २९८ सार्वजनिक पथदिव्यांची १२ लाख ७७ हजार ७२१ रूपयांची थकबाकी असली तरी शासनाकडून हे अनुदान महावितरणकडे वर्ग होत असते. त्यामुळे जिल्ह्यातील १५९७ विविध शासकीय कार्यालयांनी ५५ लाख ९३ हजार ९१३ रूपये थकविले आहेत. (प्रतिनिधी)
शासकीय थकबाकी ५६ लाख
By admin | Published: December 09, 2014 1:20 AM