शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण

By सुधीर राणे | Published: August 31, 2022 12:16 PM

श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळ पासूनच पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला.

कणकवली : ' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात आज, बुधवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ३२५ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३५७ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरु होती. भाद्रपद महिना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच बुधवारी गणरायाची भक्तीमय वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली.गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी सोमवारी तर काही जणांनी काल, मंगळवारी श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या. तर काही ठिकाणी आज, बुधवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती. ढोल, ताशांचा गजर जरी मोठ्या प्रमाणात ऐकू येत नसला तरी फटाक्यांची आतषबाजी अनेक ठिकाणी सुरू होती.श्री गणेश मुर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकविस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच अन्य धार्मिक विधि  करण्याचा परिपाठ सुरु झाला आहे. तो श्री गणेश मूर्ती विसर्जनापर्यंत सुरु राहाणार आहे.प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणिस, एकविस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.   प्रशासनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे.मृदंग, तबल्याच्या साथीने आरतीचे स्वर उमटले!घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने वाट पहाणाऱ्या लहान थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. टाळ, ढोलकी, मृदंग, तबला, हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले.पावसाच्या उघडीपीने दिलासा!श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळ पासूनच पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला. तसेच श्री गणेश मूर्ती घरी आणताना होणारी तारांबळ टाळता आली. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव