सिंधुदुर्गनगरी : भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव अर्थात 'सी एम चषक' स्पर्धेचा भव्य शुभारंभ शानदार पद्धतीत व उत्साही वातावरणात सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडासंकुल येथे संपन्न झाला. भाजपचे आ. प्रसाद लाड व आ निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थित झाला प्रारंभ झाला. आ. लाड , आ. डावखरे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलीत केली.या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीश जगताप, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, प्रदेश उपाध्यक्ष निलेश नार्वेकर, भाजपच्या प्रदेश कार्यालयातील कार्यालयीन मंत्री शरद चव्हाण, माजी आमदार राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे, नेते अतुल रावराणे, नेते संदेश पारकर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत प्रभारी राजू राऊळ, अनंतराज पाटकर रश्मी लुडबे, स्नेहा तेंडूलकर तसेच जिल्हा पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, क्रीडा स्पर्धासाठी जिल्हा क्रीडा संकुल मैदान भाजपने स्वखर्चातुन सुसज्ज केले आहे. शुभारंभ झाल्यानंतर दिवसभर १०० मी व ४०० मी धावणे, खो-खो, कुस्ती, कॅरम आणि फुटबॉल या स्पर्धा सुरु होणार आहेत.
कॅरम स्पर्धा - १५ व १६ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ- बॅडमिंटन हाल, क्रीडा संकुल ओरोस, कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) - १५ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ- स्वातंत्र्य स्मारक हॉल, क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी, फुटबाल स्पर्धा- १५ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ- डॉन बॉस्को हायस्कूल मैदान, सिंधुदुर्गनगरी, १०० मी व ४००मी.धावणे स्पर्धा - १५ डिसेंबर सकाळी ९ वा. स्थळ-जिल्हा क्रीडा संकुल मैदान, सिंधुदुर्गनगरी , खो खो (महिला / पुरुष) स्पर्धा - १५ रोजी सकाळी ९ वा. स्थळ-जिल्हा क्रीडा संकुल मैदान, सिंधुदुर्गनगरी या वेळेत वरील स्पर्धा होणार आहेत.