दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : आडाळी एमआयडीसीत दिडशे एकर क्षेत्रात सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट व इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटऱ्या उत्पादन करणारे कारखाने उभारू ज्यातून साधारणतः बाराशे जणांना तरी रोजगार मिळेल अशी ग्वाही आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे संचालक मनोहर जगताप यांनी दिली.राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत सोमवारी जगताप यांनी आडाळी एमआयडीसीमधील जमिन क्षेत्राची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.गेल्या दोन ते तीन दिवसांपुर्वी मंत्री केसरकर व आर्यन ग्रुपचे संचालक मनोहर जगताप यांनी आडाळी एमआयडीसी व तिलारी धरण परिसराची हॅलिकॉप्टरने हवाई पाहणी केली होती. मात्र सोमवारी प्रत्यक्ष आडाळी एमआयडीसीला भेट देत तेथील जमिन क्षेत्राची पाहणी केली.यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, उपअभियंता अविनाश रेवणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे चिटणीस, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार अरुण खानोलकर, मंडळ अधिकारी राजन गवस, आडाळी सरपंच पराग गावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांसह पदाधिकारी कार्यकर्ते व आडाळी ग्रामस्थ उपस्थित होते.
आडाळीत ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट उभारणार, आर्यन ग्रुप संचालकांची माहिती; मंत्री केसरकरांसह केली जागेची पाहणी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 24, 2023 6:43 PM