शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

व्यापारीवर्गासाठी जीएसटी सोईस्कर : रविराज जाधव

By admin | Published: May 08, 2017 3:36 PM

देवगड येथे पार पडली जी. एस. टी. कर प्रणालीची पहिली कार्यशाळा

सिंधुदुर्गनगरी, दि. 0८ : जी. एस. टी. करामुळे शासनाची जबाबदारी वाढणार असून व्यापारी वर्गासाठी जी. एस. टी. सोईस्कर होणार आहे तसेच व्यापारी वर्गाला येणा-या अडचणीचा सामना करीत पुढे जाणे आवश्यक असल्याचे मत विक्रीकर विभागाचे विक्रीकर उपायुक्त रविराज जाधव यांनी व्यक्त केले.जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात जी. एस. टी. कर प्रणाली ज्ञानसागर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू, अरविंद नेवाळकर, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सचिव प्रमोद नलावडे तसेच व्यापारी उपस्थित होते.जाधव म्हणाले की, प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर हे दोन कर आपल्या रोजच्या व्यवहारात येणारे दोन कर असून जी. एस. टी. चे अप्रत्यक्ष कराच्या रुपात येणार आहे. तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आदींकडून वेगवेगळ्या रुपाने कर आकारण्यात येतात. मात्र जी. एस. टी.च्या रुपाने सर्व कर एकाच ठिकाणी आकारले जाणार आहेत. यामध्ये करमणूक कर देखील रद्द होऊन त्याचे रुपांतर जी. एस. टी. मध्ये होणार असून व्यापारी वगार्ला विविध ठिकाणी नोंदणी करावी लागणार नसून एकाच ठिकाणी नोंदणी करावी लागाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटी अंतर्गत नोंदणी, रिटर्न भरणे, ई- सर्व्हिसेस या बाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली.वळंजू म्हणाले की, जी. एस. टी. सारखी कर प्रणाली येतच राहणार आहेत, त्यासाठी कुठल्याही व्यापारी वर्गाने डगमगून जाता कामा नये. यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नेवाळकर म्हणाले की, जिल्ह्यातील जी. एस. टी. कर प्रणालीचे पहिले ज्ञानसत्राचे आयोजन देवगड व्यापारी संघाने केले आहे. तसेच व्यापारी वगार्ने देवाण घेवाण करताना वॅट नंबर देणे आवश्यक असून बिलावर वॅट नंबर असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले.