आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ : आजमितीस विविध प्रकारचे अप्रत्यक्ष कर व्यवहारात आहेत. तथापि आता नविन जीएसटी करप्रणाली लागू होत असल्याने व्यापा-यांबरोबरच ग्राहकांना सुध्दा या करप्रणालीचा लाभ होईल असे मत विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार साळोखे यांनी कणकवली कॉलेजमध्ये आयोजित जनजागृती मेळाव्यात व्यक्त केलेजीएसटी करप्रणाली बाबत विक्रीकर विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत साळोखे बोलत होते. यावेळी व्यापारी संघाचे अध्?यक्ष विजयकुमार वळंजू, सचिव नार्वेकर, दयानंद उबाळे, संतोष काकडे, नितीनकुमार पटेल, हर्णे, कामत तसेच व्यापारी उपस्थित होते. साळोखे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन या माध्?यमातून जीएसटी करप्रणालीची सविस्तर माहिती यावेळी दिली. एकाच ठिकाणी नोंदणी, रिटर्न कसे भरावे, पेमेंट कसे करावे, खरेदी वरील क्रेडीट कशा पध्दतीने वापरता येणार या बाबतची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.प्रारंभी विक्रीकर विभागाचे रविकुमार जाधव यांनी प्रास्ताविकात जीएसटीमुळे ह्यएक देश एक करह्ण ही संकल्पना विषद करुन सांगितली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापा-यांसाठी विविध ठिकाणी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.