शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हत्तींना पकडणाऱ्या टीमचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

By admin | Published: February 13, 2015 1:11 AM

ही मोहीम राबविण्यासाठी पैशापेक्षा विविध पातळीवर परवानग्या लागतात. त्याचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत यांनी केला व त्यास कर्नाटक राज्यानेही सहकार्य केले.

माणगाव : डॉ. उमाशंकर यांच्या टीमने दोन रानटी हत्तींना जेरबंद करून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व माणगाव खोऱ्यात वास्तव्यास असलेला तिसरा हत्ती पकडण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी आंबेरी येथे भेट दिली. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, तिन्ही हत्तींना पकडून आंबेरी येथेच त्यांना कर्नाटकातील तज्ज्ञ मंडळींकडून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळ्या पॅकेजची तरतूद मी करणार असून, या तिन्ही हत्तींचा वापर पर्यटनासाठी करण्यात येईल. दोडामार्ग परिसरात वावरणाऱ्या चार हत्तींचा अधिवास कायम ठेवण्यासाठी पूरक अशा उपाययोजना करण्यात येतील. जेणेकरून ते चारही हत्ती मानवी वस्तीत येणार नाही. मात्र, त्याचा पर्यटनासाठी उपयोग होईल. ही मोहीम राबविण्यासाठी पैशापेक्षा विविध पातळीवर परवानग्या लागतात. त्याचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत यांनी केला व त्यास कर्नाटक राज्यानेही सहकार्य केले. तसेच मोहिमेस पूरक अशी कामगिरी महाराष्ट्र वनविभागानेही केल्याने या सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले. तसेच या मोहिमेचे प्रमुख डॉ. उमाशंकर व दोन्ही हत्तींना डॉट मारणारे व्यंकटेश तसेच करिमभैय्या व रमेश यांचा सत्कार पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. माणगाव जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर, योगेश धुरी, सुभाष भिसे, पंचायत समिती सदस्य संतोष कुंभार यांच्यासह मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम आदी वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हत्तींचा वापर जंगल सफरीसाठी करणारया तीनही हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी खास कर्नाटकातील पथकाला बोलावून हत्तींना प्रशिक्षित करून जंगल सफरीसारखे पर्यटन सिंधुुदुर्गात सुरू होण्याच्या दृष्टीनेही आपला प्रयत्न असेल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.