मालवण : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारातील नेते, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते म्हणून गुलाबराव चव्हाण यांना ओळखले जाते. सोमवारी त्यांनी राणेंच्या येथील नीलरत्न निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अशोक सावंत, दिलीप रावराणे, संजय चव्हाण, राजू राऊळ, सुदेश आचरेकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, बाबा परब यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, आता जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आता शिवसेनेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी चंग बांधला आहे. जिल्हा बँकेवर नारायण राणेंनी पाच वर्षांपूर्वी सत्ता काबिज केली होती. आता बदलत्या राजकारणानुसार बँक भाजपाच्या ताब्यात येण्यासाठी अशा वेगवेगळ्या खेळी खेळल्या जाणार आहेत.जिल्हा बँकेच्या सत्तेत मोलाचा वाटागुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्यापासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. जिल्हा बँकेच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
गुलाबराव चव्हाण भाजपमध्ये, फडणवीस, राणेंच्या उपस्थितीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 6:05 PM
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारातील नेते, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
ठळक मुद्देजिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण भाजपमध्येफडणवीस, राणेंच्या उपस्थितीत प्रवेश, सहकार क्षेत्राला खिंडार