आॅनलाईन लोकमतमालवण, दि. ३१ : मालवण शहरातील मेढा येथील मारुती पाटील यांच्या अनधिकृत बांधकामांवर नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात बुधवारी कारवाई केली.मेढा येथील मारुती पाटील यांचे बांधकाम अनधिकृत होते. याबाबत त्यांना १२ डिसेंबर २0१६ रोजी मालवण नगरपालिकेने नोटीसही बजावली होती. तरीही पाटील यांनी हे बांधकाम सुरुच ठेवले होते. कोणतीही परवानगी न घेता त्यांनी हे बांधकाम सुरु ठेवल्याने नगरपालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. जेसीबीच्या सहाय्याने ही इमारत तोडण्याचे काम बुधवारी सकाळी नगरपालिकेने सुरु केले. यामुळे पाटील कुटूंबियांनी आक्रोश सुरु केला. या कारवाईला स्थगिती देण्यासाठी पाटील कुटूंबियांनी नेतेमंडळींना फोनाफोनी केली. आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनाही त्यांनी फोन केले होते. परंतु नगरपालिकेने सुरु केलेली ही कारवाई सुरुच राहिली. पोलिस बंदोबस्तात नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई करत या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकला.
मालवणात बंदोबस्तात अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By admin | Published: May 31, 2017 2:19 PM