मालवण : येथील पंचायत समितीच्यावतीने तालुक्यात बुधवारी प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी पिकअप प्लास्टिक डे महाश्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. यात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमात ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. विविध गावातून ९७० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
मालवण तालुक्यातील ६५ गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबर स्वच्छतेविषयक शपथ घेण्यात आली. त्यानंतर मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तालुक्यात विविध ठिकाणी प्लास्टिक पिकअप डे महाश्रमदान उपक्रम राबविण्यात आला.
यात तालुक्यात कॅरीबॅग्ज, पातळ पिशव्या १९८ किलो, अपारदर्शक प्लास्टिक दुधाच्या पिशव्या ११४ किलो, वेफर्स पाकिटे, कुरकुरे, फ्रुटी, बिस्कीट पुडे यांचे रॅपर ११० किलो, प्लास्टिक बाटल्या ४०३ किलो व कॅन, तेलाच्या पिशव्या, औषधांच्या बाटल्या १४५ किलो एवढा कचरा गोळा केला.प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणाततालुक्यातील ६५ गावांमधून ९७० किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. यात तालुक्यात कॅरीबॅग्ज, पातळ पिशव्या, अपारदर्शक प्लास्टिक दुधाच्या पिशव्या, वेफर्स पाकिटे, कुरकुरे, प्लास्टिक बाटल्या व कॅन, तेलाच्या पिशव्या, औषधांच्या बाटल्या आदी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला.प्लास्टिक पिकअप डे निमित्त मालवण किनारपट्टीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.