शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे पराभव

By admin | Published: December 12, 2014 10:04 PM

नारायण राणे : कुडाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

कुडाळ : आजपर्यंत चांगली कामे करीत आलो असून चांगले नाव कमावले. अनेक दिग्गजांना मागे टाकून स्पर्धेत राहिलो. मात्र, विधानसभेत झालेला माझा पराभव हा कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळेच झाला, असे परखड मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील काँग्रेसच्या मेळाव्यात केले. कार्यकर्त्याचा मुखवटा घालून काम करणाऱ्या बदनाम लोकांच्या टीमला मी सोबत का घेऊ, असा सवालही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना करीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांच्या कार्यशैलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकांअगोदरच मला निकाल लक्षात आला होता. मात्र, दोन दिवसात मी जनतेचे मत बदलू शकत नव्हतो. येथे कार्यकर्त्यांपेक्षा ठेकेदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असेही ते म्हणाले. हा पराभव राणेंचा की कार्यकर्त्यांच्या निष्काळजीपणाचा याचा विचार करा व मुखवटे घालून फिरू नका. मी सर्व पाहतो आहे. कार्यकर्त्यांचा पिंड असेल, तर कधीही पराभव जवळ येत नाही. तुम्हाला सरपंच झालात की मस्ती येते. मी कोणालाही परका मानले नाही. या जिल्ह्याला कुटुंबच मानून सेवा केली. मात्र, याच जिल्ह्यात पराभव होईल, असे मला कधी वाटले नव्हते. माझा पराभव सोपा नसून हे काम कुणीही करू शकत नाही. आता विधानसभेत येऊन गेलेली माणसे हत्तीच्या वासानेच पळणारी आहेत, असा टोलाही त्यांनी येथील लोकप्रतिनिधींना लगावला. कार्यकर्ता कसा असावा, या संदर्भातील डॉ. हेगडेवार यांचे पुस्तक मी वाचले असून आपणही वाचून आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. नारायण घडायला ४८ वर्षे लागली, परंतु पराभव व्हायला एक क्षण लागला, असेही ते म्हणाले. आमदार सुभाष चव्हाण म्हणाले, पक्षात चार चांगली माणसे असली, तरी चालतील, परंतु बेईमान माणसे नकोत. संदेश पारकर यांनी राणेंच्या पराभवाला कार्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगितले. कोणतेही विकासाचे काम न करता विरोधकांना विजय मिळाला, याबाबत सतीश सावंत यांनी खंत व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष स्रेहलता चोरगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दिप्ती पडते, आनंद शिरवलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)