नरेंद्र बोडस -देवगड -पावसाळी वातावरणामुळे एका बाजूला सुमारे १००० मिमी पावसाच्या तुटीची भरपाई होईल या आशेवर भातशेतीधारक शेतकरी आहे. पण त्याचबरोबर त्याला अतिवृष्टीपासूनही संरक्षण हवे आहे. दुसरीकडे आंबा बागायतदार हलक्या पावसाच्या सरी व्हाव्यात अशाच मताचा आहे. तसे त्याचे गणरायाकडे साकडेही आहे. महागाईच्या तडाख्यामुळे सजावट, पाहुण्यांची सरबराई आणि गणेशोत्सवासाठी वाढीव खर्च यामुळे सर्वसामान्य देवगडवासीयसुद्धा हवालदील आहे. यंदाचा आंबा आणि मासळी हंगाम लाभदायी व्हावा अशीच आता सर्व गणेशभक्तांची गणरायाकडे प्रार्थना आहे.देवगड तालुक्यामध्ये यावर्षी सुमारे १००० मिमी पावसाची तूट आहे. यंदाच्या मोसमात १५८९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. गतवर्षी यावेळपर्यंत २५०० पेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र, आता ही तूट भरून काढण्यासाठी सध्याच्या पावसाळी वातावरणात जोरदार वृष्टी झाली तर आंबा भातपीकाचेही नुकसान होईल असाच समज बागायतदार-मच्छिमारांचा आहे. अति पावसामुळे हंगामही लांबू शकतो तर मच्छिमारी बोटी आता हळूहळू समुद्रात मच्छिमारीसाठी जावू लागल्या आहेत त्यांना हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो. देवगडच्या आंबा बागायतदारांसाठीसुद्धा सप्टेंबरच्या मध्यात पाऊस ओसरू लागणे महत्त्वाचे ठरते. याचे कारण म्हणजे बहुतांश बागायतदार संजीवकाचा वापर करतात. संजीवकाचा प्रभावी परिणाम दिसण्यासाठी सप्टेंबर मध्यापासून पावसाचे प्रमाण ओसरू लागणे महत्वाचे असते. त्यामुळे त्यांची हाक बाप्पा ऐकणार का? हा प्रश्न बागायतदारांसमोर उभा राहिला आहे.आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे. आतापासूनच एस. टी. स्थानकाकडे धावकोकण रेल्वेच्या अनियमिततेमुळे प्रवासीवर्ग परतीच्या प्रवासाबाबत सावध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासगी वाहनांबरोबर एस. टी. व खासगी बस सर्व्हीस यांनाच प्रवाशांची पसंती दिसत असून परतीच्या आरक्षणासाठीही आरक्षण खिडक्यांवर गर्दी आताच दिसू लागली आहे.
गणेशभक्तांच्या उत्साहाला लगाम
By admin | Published: August 28, 2014 9:28 PM