शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

हातीपमध्ये चक्क तळीच गेली चोरीला, तक्रार दाखल

By admin | Published: February 12, 2015 11:58 PM

दापोली तालुका : संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना सापडली वादात

दापोली : तालुक्यातील हातीप- बौध्दवाडी येथे चोरीची घटना घडली आहे. मात्र, यावेळी सोने-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम चोरीला गेलेली नाही तर संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योेजनेतून सन २००२-०३मध्ये बांधलेली तळी चोरीला गेली आहे. या गमतीशीर पण तितक्याच संतापजनक परिस्थितीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.हातीप - बौध्दवाडीमध्ये सन २००२-०३ मध्ये बांधण्यास घेतलेल्या तळी बांधकामाची चौकशी करण्याची मागणी जान्हवी गोडबोले आणि ग्रामस्थांनी केली होती. यापूर्वी या तळीच्या बांधकामाची पंचायत समिती स्तरावरून पाहणी करण्यात आली होती. १४ जानेवारीला प्रत्यक्ष जागेवर जाऊन ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह पंचांसमक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये सर्व्हे नं. ७२ व हिस्सा नं. १४ या जागेत तळीचे बांधकाम केल्याच्या कोणत्याही स्वरूपाच्या खुणा आढळलेल्या नाहीत.तसेच या जागेवर सद्यस्थितीत खोदाई अथवा बांधकाम न झाल्याचा निर्वाळा जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपअभियंत्यांनी पाहणीत काढला आहे. तळीच्या केलेल्या मूल्यांकनाची पडताळणी करण्यासाठी ग्रामसेवकांकडे मोजमाप वहीची व अंदाजपत्रकाची मागणी करण्यात आली होती. मात्र, मोजमाप वही ठेवण्यात आली नसून, अंदाजपत्रकाची प्रत, खर्ची घालण्यात आलेल्या मस्टर व साहित्याची व्हाऊचर्स दाखवण्यात आली. मात्र, मोजमाप वही उपलब्ध नसल्यामुळे मस्टर व साहित्य व्हाऊचर याची पडताळणी करण्यात आलेली नाही. यामुळे केलेले मूल्यांकन नेमके कसले करण्यात आले, हे गुलदस्त्यात राहिले आहे.पाहणीमध्ये ज्या जागेवर तळी बांधल्याचे ग्रामपंचायतीकडून नमूद करण्यात आले होते, त्या जागी सद्यस्थितीत खोदाई अथवा बांधकाम केल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. तक्रारदार जान्हवी गोडबोले आणि गजानन सागवेकर यांनी प्रत्यक्षात तळीचे बांधकामच न झाल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.उपसरपंच बळीराम होडबे यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी आपण कायमस्वरूपी मुंबईत वास्तव्यास असल्याने आपणास माहीत नसल्याचे सांगितले. बौध्दवाडीतील ग्रामस्थ जितेंद्र पवार यांनी सन २००२-0३ मध्ये चौकोनी आकारात ७ ते ८ फूट खोलीचे तळीचे खोदकाम करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, लांबी व रूंदी नक्की सांगण्यात असमर्थता दर्शवली. पाहणीमध्ये येथे तळी नक्की बांधली की नाही, हे मोजमापवहीसमोर आलेले नाही. पाहणीप्रसंगी तक्रारदार जान्हवी गोडबोले, गजानन सागवेकर, उपसरपंच बळीराम होडबे, ग्रामस्थ जितेंद्र पवार, ग्रामपंचायत शिपाई संजय शेडगे, ग्रामसेवक अशोक शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता आर. अ‍े. देसाई, शाखा अभियंता दि. अ. धारप आदी उपस्थित होते. मात्र, सरपंचांना उपस्थित राहण्याबद्दल कळवल्यानंतरही संबंधित सरपंच उपस्थित न राहिल्याने तळीचे गौडबंगाल कायम राहिले आहे. (प्रतिनिधी)