सावंतवाडी : काँग्रेसने राज्यात गोरगरीब जनतेच्या फायद्याच्या अनेक योजना आणल्या आहेत. मात्र त्याउलट आताच्या भाजप सरकारच्या काळात महागाई आणि जनतेला हवालदिल करणाºया निर्णयांमुळे जनता या सरकारला कंटाळली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाची स्थापना १२५ वर्षांपूर्वी अनेक स्वातंत्र्यवीर तसेच महात्मा गांधींच्या त्यागातून झाली आहे. तसेच पक्षाने लोकहिताची अनेक विकासकामे केली असून राजीव गांधी जीवनदायी योजना, मोफत १०८ रुग्णवाहिका अशा महत्त्वपूर्ण योजना काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आल्या आहेत.
राजीव गांधी निराधार योेजनेपासून ते महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा त्याचप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंत गणवेश व मोफत पुस्तके, पोषण आहार देण्याचे काम, शेतकºयांना शेतकरी जनता अपघात विमा योजना काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे.
समाजातील सर्व जातीच्या व्यक्तींना तसेच महिलांना नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीत ५० टक्के आरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण धोरण राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू झाले. त्यामुळे समाजात आज महिला मानाने फिरत आहेत.
याउलट युती सरकारच्या काळात अच्छे दिन आणणाºया सरकारकडून भरमसाट महागाई, पेट्रोल दरवाढ, नोटाबंदीमुळे बाजारपेठेवर झालेला आर्थिक परिणाम यामुळे जनता कंटाळली आहे. जीएसटीचा दर १८ टक्केपर्यंत काँग्रेस राजवटीच्या काळात ठरलेला होता. तो आता २८ ते ३५ टक्केपर्यंत झाला आहे. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवारांना जनता या निवडणुकीत नाकारल्याशिवाय राहणार नाही, असेही राजू मसुरकर यांनी म्हटले आहे.