शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

‘तो’ टँकर कणकवलीत पकडला

By admin | Published: July 02, 2016 11:20 PM

करूळ घाटात घडली होती घटना : अपघातात राजापूर तालुक्यातील एक जखमी

वैभववाडी : करुळ घाटात ओमनीला धडकून पसार झालेला गुजरातचा टँकर कणकवली पोलिसांनी पकडला. या धडकेत राजापूर तालुक्यातील नानारचे हानिफ युसूफ साखरकर (वय ४५) किरकोळ जखमी झाले. ही घटना सकाळी ८.३0 च्या दरम्यान घडली असून टँकर चालक विकेशभाई शिवाजीभाई रठवा (वय ३३, रा. गुजरात) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हानिफ साखरकर ओमनीतून (क्रमांक -एम एच 0८ ; ए जी- 0६६३) करुळ घाटमार्गे कोल्हापूरला निघाले होते. दिंडवणेवाडी येथे गोव्याला जाणाऱ्या टँकरने (क्रमांक जी जे- 0६; ए टी- ४५७५) ओमनीला धडक दिली. त्यामुळे हानिफ साखरकर जखमी झाले. परंतु, जखमीची विचारपूस न करता चालक विकेशभाई रठवा टँकरसह अपघात स्थळावरुन पसार झाला. त्यामुळे जखमी अवस्थेत हानिफ यांनी टँकरचा पाठलाग केला. मात्र, टँकर गोव्याकडे सुसाट निघून गेल्यामुळे हानिफ यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. जखमी हानिफ याच्या माहितीवरुन वैभववाडी पोलिसांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कणकवलीतील वाहतूक पोलिस प्रकाश गवस यांनी गोव्याकडे निघालेला टँकर अडविला. त्यानंतर दुपारी अडीचनंतर टँकर वैभववाडीत आणला. टँकर चालक विकेशभाई याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक उपनिरीक्षक बी. ए. कदम या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) पोलिसांची सारवासारव कशासाठी? ४ करुळ घाटात सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात ओमनीला धडक देऊन पसार झालेला टँकर करुळ तपासणी नाका आणि वैभववाडी पोलिस ठाण्यासमोरुन गेला. तो कणकवली शहरात पोलिसांनी अडविला. मात्र, मारहाणीच्या भीतीने टँकरचालक अपघात स्थळावरुन पळाला. पोलिस ठाणे माहीत नसल्याने पुढे गेला. अशी सारवासारव पोलिसांकडून केली जात आहे. ही सारवासारव कशासाठी? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.