खेड : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली अनेकांकडून गोळा केलेल्या लाखो रूपयांच्या अपहारप्रकरणी पुणेस्थित शेअरदलाल अविनाश दिक्षित प्रकरणी येथील न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या दिक्षित याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी आवश्यक असे सर्व पुरावे गोळा केले आहेत.अविनाश दिक्षित याने ८ वर्षांपूर्वी खेड येथील एका बड्या धेंडाला हाताशी धरून हा अपहार केला आहे. अविनाश दिक्षित हा मात्र कधीही समोर आला नव्हता. यामुळे गुंतवणकदारांनी थेट त्याच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही. मात्र, खेड येथील या बड्या धेंड्यांनेच दिक्षित याच्या कंपनीसाठी लाखो रूपये गोळा केले होते. तशा पावत्याही लोकांना देण्यात आल्या आहेत. सुरूवातीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो, असे सांगून स्वत:च्या नावाने गुंतवणूक कंपनी स्थापन करून त्याद्वारे दिक्षित याने खेड येथील नेमलेल्या या बड्या धेंडामार्फत ५५ लाख रूपये गोळा केले होते. मात्र, ५-५ वर्षे होऊनदेखील गुंतवणुकदारांना पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणुकदारांनी खेड येथील या बड्या धेंडाकडे पैशाची रितसर मागणी केली. मात्र, त्याने याकडे कानाडोळा करीत दिक्षित याचेकडे बोट दाखविले होते. यामुळे गुंतवणुकदारांना संशय आला. याविषयी खेड येथील पोलीस स्थानकात तशी रितसर तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर खेड येथील त्या धेंडाला चौकशीसाठी बोलावण्यात आले असता त्याने दिक्षित याचे नाव वारंवार सांगितले.याप्रकरणी या धेंडासह अविनाश दिक्षित याच्याविरोधात खेड पोेलीस स्थानकात तक्रार देण्यात आल्यानंतर दिक्षित कधीही हजर झाला नाही़ मात्र, न्यायालयाकडुन अटक वॉरंट काढल्याने दिक्षित याची पत्नी खेड येथील न्यायालयात हजर झाली होती. तिने अविनाश दिक्षित कोठे गेला आहे याविषयी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे कारण सांगत वेळ निभावून नेली होती. अखेर अविनाशला अटक झाली़ मात्र, तो जामीनावर सुटला. दरम्यान या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असून, त्याच्याविरोधात आता सबळ पुरावे सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचेवर दोषारोप दाखल करण्यात आले आहेत. त्याप्रकरणी न्यायालयात लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती खेडमधील पोलीस सुत्रांकडून उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)शेअर बाजारमध्ये गुंतवणुकीचे दाखवले होते आमिष.आठ वर्षांपूर्वी केला होता अपहार.गुंतवणूकदारांशी अविनाशने कोणताही आर्थिक व्यवहार केला नव्हता.अविनाशला अटक होऊनही जामिनावर सुटका.अद्यापही प्रकरणाची चौकशी सुरु.अविनाशविरोधात सबळ पुरावे सापडल्याचा दावा.
शेअरदलाल दिक्षितप्रकरणी लवकरच सुनावणी
By admin | Published: September 17, 2015 11:19 PM