शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

येत्या चार तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

By सुधीर राणे | Published: June 28, 2023 12:48 PM

जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

कणकवली : राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर जोरदार पावसाची वाट शेतकरी राजा पाहत होता. मात्र, शनिवारी जोराचा पाऊस झाल्यानंतर इतर दिवशी तुरळक सरीच कोसळत होत्या. मात्र, काल मंगळवारी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत येत्या तीन-चार तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने  वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३० जून पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. मंगळवारी रात्रीपासून  सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच सध्या भात शेतीच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे.मुसळधार पावसाच्या अनुषंगाने नागरिकांना तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सलग आठवडाभर जोरदार पाऊस झाल्यास नदी, ओहोळामधील पाणी वाढणार आहे. पावसाने जोर धरल्याने नागरिकांना पाणी टंचाई पासून मुक्ती मिळणार आहे. मालवण तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.९ मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण सरासरी ३२८.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात)देवगड ९८.४ (२९३.४), मालवण ११५ (३४४.४), सावंतवाडी १०७.५ (४३१.०), वेंगुर्ला ७३.० (२८४.७), कणकवली ६०.७ (२८४.३), कुडाळ ८९.५ (३४२.१), वैभववाडी ७३.० (२९३.७), दोडामार्ग ७४.८ (३६०.८) असा पाऊस झाला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस