शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
3
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
4
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
5
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
6
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
7
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
8
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
9
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
10
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
11
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
12
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
13
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
15
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
16
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
17
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
20
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."

अतिवृष्टीने करुळ घाटात रस्ता खचला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 6:36 PM

Rain In Konkan Sindhudurg : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.

ठळक मुद्देपोलीस, बांधकामकडून तात्पुरती डागडुजी एकेरी वाहतूक सुरु

वैभववाडी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.रविवारी रात्रभर संततधार सुरु होती.. घाट परिसरात अतिवृष्टी सुरु आहे. याचा फटका करुळ घाटरस्त्याला बसला आहे. करुळ घाटाच्या मध्यावर रस्त्याची मोरी खचली असून लगतचा रस्ताही खचण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचलाय तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे.दरम्यान, रस्त्यालगत भगदाड पडल्याचे समजताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार राजू जामसंडेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तेथून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना खचलेल्या ठिकाणी तातडीने बोलावून घेतले. बांधकामचे कर्मचारी घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात गुतले आहेत. मात्र तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे घाटरस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती धोकादायक ठरणार आहे. खचलेल्या रस्त्याचा काही भाग खचण्याची शक्यता असल्यामुळे पावसात काम करणे शक्य होणार नाही. पाऊस जर असाच आणखी तीन चार दिवस कायम राहील्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षिपणाचा परिणामकरुळ घाटरस्त्याच्या दरडींच्या बाजूला पक्की गटारे बांधण्यात आलेली आहेत. परंतु, पावसाळा सुरु होण्यापूर्वी या गटारात पडलेली दगडमातीचा गाळ काढणे आवश्यक होते. तो न काढल्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. ते पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे रस्त्याला भगदाड पडणे, रस्ता खचणे असे प्रकार घडत असतात. ही बाब पावसाळ्याच्या प्रारंभीच ह्यलोकमतह्णने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.करुळ घाटमार्गाची देखभाल करणार कोण?तळेरे-कोल्हापूर हा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी झाला आहे. पूर्वी हा राज्यमार्ग होता. त्यावेळी त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे गेल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्रधिकरणकडे आहे. परंतु, या महामार्ग प्रधिकरणाचे कार्यालयात करुळ घाटापासून ५८ किलोमीटरवर कोल्हापूरात आहे. त्यामुळे रस्त्यासह घाटमार्गाची आपत्कालीन देखभाल कोण करणार हा प्रश्नच आहे. 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग