शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

आचरा दशक्रोशीला पावसाने झोडपले; शिवापूर बंधारा गेला वाहून, घरात पाणी आल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 09, 2024 2:10 PM

सिद्धेश आचरेकर आचरा : जूनमध्ये हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाभर दाणादाण उडवली. यात मालवण तालुक्याला पावसाने सलग ...

सिद्धेश आचरेकरआचरा : जूनमध्ये हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाभर दाणादाण उडवली. यात मालवण तालुक्याला पावसाने सलग दोन दिवस झोडपून काढले. तालुक्यातील आचरा दशक्रोशीला मोठा फटका बसला. आचरा, चिंदर, वायंगणीसह अन्य गावांमध्ये परिस्थिती निर्माण झाली. रविवार आणि सोमवारी नॉनस्टॉप पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. आचरा हिर्लेवाडी, गाऊडवाडी, ख्रिश्चनवाडी, पिरावाडी येथील घरांमध्ये पाणी घुसले. ख्रिश्चनवाडीतील ग्रामस्थांनी लगतच्या घरांचा आसरा घेतला. तर काहींची काझीवाडा वाचनालयात व्यवस्था करण्यात आली.सोमवारी रात्री ढगफुटीसदृश कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आचरा परिसराला चांगलेच झोडपले. आचरा गाऊडवाडी, हिर्लेवाडी, चिंदर, सडेवाडी परिसर जलमय झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. हिर्लेवाडी गाऊडवाडी परिसरात मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. गाऊडवाडी भागात ग्रामपंचायत परिसर पूर्णतः जलमय बनला होता.

रस्त्यावर चार ते पाच फूट पाणीहिर्लेवाडी भागालाही पावसाचा मोठा फटका बसला. सोमवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने सायंकाळी साडेसात वाजल्यापासून हिर्लेवाडीला पाण्याने विळखा घातला. रात्री पाण्याचा वेग वाढला. पुरुषोत्तम पेडणेकर, गोरखनाथ पेडणेकर, अश्विन हळदणकर, राजू पेडणेकर यांच्या घरात पाणी गेले होते. घरातील सामान अन्नधान्य भिजून नुकसान झाले आहे. ब्राह्मणदेव मंदिर परिसर देखील जलमय झाला होता. रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी आले होते.

पतन विभागाच्या बंधाऱ्याला फटकाहिर्लेवाडी येथील पतन विभागाच्या शिवापूर बंधाऱ्यालाही याचा फटका बसला. पाण्याच्या झोताबरोबर पुलाचे काही क्षणातच दोन भाग झाले. या परिसरात तौक्ते वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आचरा गाऊडवाडी येथील सायमंड फर्नाडिस, जाकारीयस फर्नाडिस (गुरुजी), बेन्तु फर्नाडिस, सिल्वेस्टर फर्नाडिस, पीटर फर्नाडिस, साल्वादर मिरीन्डा लॅन्सी फर्नाडिस आदींसह सर्व ख्रिश्चनवाडीतील घरात पाणी घुसल्याने येथील काहींनी लगतच्या स्लॅबच्या घराचा आसरा घेतला होता. तर काहींना काझीवाडा वाचनालयात हलविण्यात आले होते. गाऊडवाडी येथील माजी उपसरपंच अनिल करंजे, ग्रामपंचायत कार्यालय आचराच्या दरवाजापर्यंत रात्री पाणी आले होते. पारवाडीला पावसाचा फटका बसला. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

चिंदर सडेवाडीत घरांमध्ये पाणी घुसलेमुसळधार पावसाने चिंदर सडेवाडी परीसराला फटका बसला. येथील बच्चू सद्गुरू यांच्या वाहनांमध्येही पाणी घुसल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. तर सुधीर मसुरकर, मोहन गोलतकर, उल्हास, वनिता वराडकर यांच्या घरात पाणी घुसले होते. यात मसुरकरव्यतिरिक्त अन्य घरे बंद असल्याचे समजते. याबाबत मंगळवारी मंडल अधिकारी अजय परब, तलाठी संतोष जाधव, पोलिस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस