सिंधुदुर्गनगरी : महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देणे, त्यांना आवश्यकते मार्गदर्शन करणे, तालुका व जिल्हा स्तरावर मंच उपलब्ध करुन देणे व उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही योजना सुरू केली आहे.जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान, राष्ट्रीय शहरी जिवनन्नोत्ती अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत तयार केलेले व पंचसुत्री पालन करणारे बचत गट या योजनेचे लाभार्थी असतील. योजनेच्या अंमलबजावणीचे चार टप्पे असून पहिल्या टप्प्यात सर्व तालुक्यांमध्ये माहिती सत्रांच्या आयोजन करण्यात येणार आहे.दुसरा टप्पा तालुकास्तरावर सादरीकरण व तालुकास्तरीय समितीकडून १0 विजेत्या बचत गटांची घोषणा होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात तालुकास्तरावर निवड झालेल्या बचतगटांचे जिल्हा स्तरावर समितीपुढे सादरीकरण व जिल्हा स्तरावरील १0 गटांची निवड करण्यात येणार आहे. चौथा व अंतिम टप्प्यात बक्षीस वितरण व उत्कृष्ट १0 संकल्पनांना प्रत्येकी २0 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यात १७ जुलै रोजी कुडाळ व कणकवली तालुक्यात सकाळी व वेंगुर्ला व वैभववाडी तालुक्यात माहिती सत्राचे आयोजन केले आहे. १८ रोजी मालवण तालुक्यात सकाळी व देवगड तालुक्यात दुपारी, सावंतवाडी तालुक्यात १९ रोजी सकाळी आणि दोडामार्ग तालुक्यात सायंकाळी अशा पद्धतीने माहिती सत्रांचे आयोजन केले आहे.या सत्रांमध्येच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या बिझनेस प्लान कॉम्पिटीशन विषयीही माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाशी संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बचत गटांनी व नव उद्योजक तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक संचालक सु.शं. पवार यांनी केले आहे.
हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:41 PM
महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देणे, त्यांना आवश्यकते मार्गदर्शन करणे, तालुका व जिल्हा स्तरावर मंच उपलब्ध करुन देणे व उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही योजना सुरू केली आहे.
ठळक मुद्दे हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्रम जाहीर महिला बचतगटांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना मिळणार प्रोत्साहन