शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

मालदोलीतील ‘त्या’ हेरिटेज वास्तूला पर्यटनात स्थान हवे!

By admin | Published: September 15, 2016 1:03 AM

चिपळूण तालुका : अभियांत्रिकी नवल ठरलेली रामचंद्र वासुदेव मराठे न्यास वास्तू नव्वद वर्षानंतरही जशीच्या तशी--अभियंता दिन विशेष

चिपळूण : मालदोली गावात साधारण नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या त्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यास या हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील या वास्तूची आजची काठीण्यपातळी पाहता तिचे संपूर्ण नियोजन करणारी व्यक्ती त्या काळातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकार असावी, या मताशी कोणीही सहमत होईल.साडेसात एकर जागेतील सुमारे २ हजार चौरसफूट आकाराच्या या वास्तूच्या अंतर्गत रचनेविषयी श्रीकांत बापट यांनी माहिती दिली. यावेळी शिक्षक विलास महाडिक उपस्थित होते. मुख्य दरवाजापासून पाठीमागच्या दरवाजापर्यंत सरळरेषेत मोकळी जागा असून, (कॉरिडॉर) त्याच्या दोन्ही बाजूला वास्तूतील खोल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आहे. वास्तूच्या आतून आणि बाहेरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचे स्वतंत्र दोन जिने आहेत. जिने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज भासणार नाही वा तो चढताना दमणार नाही, अशी तंत्रशुद्ध रचना करण्यात आली आहे. वास्तूतील काही खोल्या गरजेप्रमाणे एकमेकांना जोडल्या आहेत. जेवणासाठी लागणारे मसाल्याचे मिश्रण बनवण्यासाठी, मिक्सर नसलेल्या काळातील घडीव ‘पाटा’ येथे आहे. पाण्यासाठी विहीर तसेच पाठीमागील बाजूकडील डोंगरात असलेल्या झऱ्यांचे पाणी, विशिष्ठ उंचीवर १० बाय २० फूट आकाराचे मोठाले टाके बांधून पाणी साठवण्यात आले आहे. तब्बल नव्वद वर्षांनंतरही या वास्तूतील लाकडाला काही झालेले नाही. त्या काळात या लाकडाला प्रतिबंधक व्यवस्था केलेली असणार हे नक्की आहे.वास्तूतील जवळपास वीस -बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंंतीतील दोन कपाटे आहेत, खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. सायंकाळी किमान सात वाजेपर्यंत वास्तूला विजेची आवश्यकता भासत नाही. प्रत्येक दरवाजाला व्हेंटीलेटरची रचना आहे. कौलारू बांधणीच्या या वास्तूतील आतील छताच्या रिपांचा भाग वास्तूसौंदर्याचा विचार करून फळ्या मारून बंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)विश्व हिंदू परिषदेला दानमधुकाका बर्वे यांच्यामुळे विविध सेवाभावी प्रकल्पांसाठी ही वास्तू विश्व हिंंदू परिषद महाराष्ट्र प्रदेशास दान मिळाली. वास्तू नोंदणीकृत रामचंद्र वासुदेव मराठे न्यास १० मे १९८५ रोजी करण्यात आली. दानपत्र यशवंत परशुराम मराठे यांनी केले होते. शिक्षण, वैद्यकीय साहाय्य, दारिद्र्य निवारण, नैसर्गिक आपत्ती परिहार, उपेक्षितांचा उत्कर्ष, ग्रामविकास, संस्कृत भाषा शिक्षण हे या न्यासाचे मुख्य उद्देश आहेत. न्यासाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश साठे, सचिव श्रीकांत ऊर्फ भाऊ बापट, विश्वस्त अनिरुद्ध भावे, श्रीनिवास केतकर, दत्ताराम केतकर, राजाभाऊ जोशी, पिनाकिन मराठे (मूळ मालकांचे वंशज) काम पाहतात. सुमारे २० वर्षांपूर्वी आरोग्य प्रकल्प राबवलासुरूवातीची सुमारे २० वर्षे बिरवाडी-महाड येथील डॉ. गोखले यांनी येथे आरोग्य प्रकल्प राबवला होता. छोट्या-मोठ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया त्या काळात येथे होत. वास्तूत आजही आॅपरेशन थिएटर नावाचा फलक आपल्याला दिसतो. तद्नंतर सुमारे १५ वर्षे हा भाग दुर्लक्षित राहिला. सध्या येथे फिरते मोफत वाचनालय आणि मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग चालतो. वाचनालयात राष्ट्रपुरुषांची ५०० पुस्तके आहेत.