मालवण: अरबी समुद्रात मध्यभागी घोंगावणाऱ्या हिक्का वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून येत आहे. समुद्रात वादळ स्थितीमुळे मोठ्या नौका बंदरातच स्थिरावल्या आहेत. त्यामुळे मासेमारीवरही परिणाम झाला आहे.
अरबी समुद्रातमध्ये निर्माण झालेल्या हिक्का वादळाच्या स्थितीमुळे मुसळदार पाऊसही पडत आहे. तसेच वादळाचा जोर खोल समुद्रात अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. किनाऱ्यावर वारा व लाटांची तीव्रता गुरुवारी सकाळी अधिक जाणवत आहे.
खोल समुद्रात जाणाऱ्या मोठ्या मासेमारी नौका निर्माण झालेल्या वादळामुळे मासेमारीस गेल्या नसून नौकांनी बंदरावरच स्थिरावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे या वादळाचा परिणाम आणखी दोन दिवस कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाण्याला करंट वाढला असल्याचेही मच्छीमारांनी सांगितले.